Western Railways

तसेच पश्चिम रेल्वेने विरार आणि सांताकूझ नवीन कार्यालये सुरु केली आहेत. हे सुनिश्चित करेल की पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात काम करणारे कर्मचारी मुंबई सेंट्रलपर्यंत संपूर्ण प्रवास करण्याऐवजी जवळच्या कार्यालयात जाऊन आपले काम करु शकतात.

मुंबई : आजपासून सुरु होणाऱ्या २ सत्रातील कार्यालायीन (Office Time) वेळेची अंमलबजावणी करणारी पश्चिम रेल्वे (W. Railways ) ही पहिली सरकारी संस्था ठरणार ( first time it will happen) आहे.  विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी दोन शिफ्टमध्ये ( duty schedule of the employees) काम करणार आहेत. पहिली शिफ्ट ही सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत सुरु होईल आणि दुसरी पाळी दुपारी २ ते ८ या वेळेत आहे. अशा प्रकारे नियोजन करणारे पश्चिम रेल्वे हे पहिलेच सरकारी कार्याल (government office) ठरणार आहे.

तसेच पश्चिम रेल्वेने विरार आणि सांताकूझ नवीन कार्यालये सुरु केली आहेत. हे सुनिश्चित करेल की पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात काम करणारे कर्मचारी मुंबई सेंट्रलपर्यंत संपूर्ण प्रवास करण्याऐवजी जवळच्या कार्यालयात जाऊन आपले काम करु शकतात.

दुसरीकडे, पश्चिम रेल्वेने पूर्वी दिवसभरात १५० अतिरिक्त सेवा चालविण्याचा निर्णय घेतला होता. पूर्वी दररोजच्या प्रवासाची संख्या ३५० असायची ती आता वाढवून ५०० करण्यात आली आहे. आतापर्यंत प्रत्येक लोकल ट्रेन सामाजिक अंतराचे निकष लक्षात घेऊन जास्तीत जास्त प्रवासी ७०० प्रवास करु शकतात.

तीन महिन्यांच्या कडक बंदोबस्तानंतर, आवश्यक सेवांमध्ये काम करत असलेल्या लोकांसाठी रेल्वे सेवा पुन्हा सुरु केल्या. लॉकडाऊन करण्यापूर्वी मुंबईतील लोकलमध्ये १२०० लोक सहज प्रवास करु शकत होते. पण आता राज्य सरकारच्या नियमांनुसार प्रत्येक ट्रेनमध्ये फक्त ७०० लोकांना परवानगी आहे.