footpaths

फुटपाथची दुर्दशा थांबवून ‘वॉकिंग फ्रेंडली’(Walking Friendly Footpath In Mumbai) बनविण्याची योजना मुंबई पालिका(BMC) प्रशासनाने हाती घेतली आहे.

  मुंबई : मुंबईतील (Mumbai) सर्वच रस्त्यांच्या फुटपाथची(Footpath) दुर्दशा झाली आहे. अनेक रस्त्यांच्या फुटपाथ गायब झाल्या आहेत. त्या चालण्यासाठी उरलेल्या नाहीत. फुटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाई झाली तरीही अतिक्रमणे कमी होत नाहीत. आता फुटपाथची ही दुर्दशा थांबवून ‘वॉकिंग फ्रेंडली’(Walking Friendly Footpath In Mumbai) बनविण्याची योजना मुंबई पालिका(BMC) प्रशासनाने हाती घेतली आहे.

  मुंबईत ११०० किलोमीटरचे रस्ते असून त्यांच्या फुटपाथ २२०० किलोमीटर इतक्‍या आहेत. १४० किलोमीटर इतक्‍या फुटपाथचा विकास पालिकेच्या वतीने दरवर्षी केला जात असल्याचा दावा पालिकेने केला आहे. फुटपाथ अतिक्रमणांनी व्यापले आहेत. अतिक्रमणांवर कारवाई झाली तरी पुन्हा पुन्हा अतिक्रमणे होत आहेत. पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने वारंवार कारवाई होत असली तरीही अतिक्रमणे हटत नाहीत हे मोठे गौडबंगाल आहे. पालिकेचे अधिकारी, पोलीस, स्थानिक राजकारणी यांच्या आर्थिक हितसंबंधातून फुटपाथवरील या अतिक्रमणांना अभय मिळत असल्याचे बोलले जात आहे.

  फुटपाथवर लावल्या जाणाऱ्या पेव्हर ब्लॉकमुळेही फुटपाथची दुर्दशा झाली आहे. फुटपाथवर लावलेले पेव्हर ब्लॉक नीट न लावल्यामुळे फुटपाथची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे फुटपाथचे चित्र बदलण्याचा निर्धार पालिकेने केला आहे. मुंबई वॉकिंग फ्रेडली बनविण्याच्या पालिका प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शहर आणि उपनगरातील अनेक ठिकाणच्या फुटपाथ गायब झाल्या आहेत. शहर आणि उपनगरातील फुटपाथ आता शोधाव्या लागत आहेत. रस्त्यांन फुटपाथ नसल्याने रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे याची प्रशासनाने दखल घेतली आहे. त्यामुळेच पादचाऱ्यांना चालण्याचा हक्क असलेल्या फुटपाथ वॉकिंग फ्रेंडली बनविण्याचा निर्धार पालिकेने व्यक्त केला आहे.

  • मुंबईतील फुटपाथची लांबी – २२०० किलोमीटर
  • गायब झालेल्या फुटपाथ – ६०० किलोमीटर

  अनेक ठिकाणच्या फुटपाथची अवस्था खराब आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यावर लावलेल्या पेव्हर ब्लॉकचा चढउतार झाला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस कमी झाल्याने आता फुटपाथच्या विकासाची कामे हाती घेणार आहेत. आम्ही फुटपाथ वॉकिंग फ्रेंडली करणार आहोत, अशी माहिती पालिकेच्या रस्ते विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.