The two biggest enemies in politics together; Chief Minister Uddhav Thackeray-Narayan Rane will appear on one stage

कोरोनाचे संकट खरेच गेलेय का हे कळायला मार्ग नाही. अजूनही हे संकट पुरते गेलेले नाही. नवे व्हायरस येत आहेतच, पण काही जुने व्हायरसही परत आले आहेत. हे जुने व्हायरस वेगवेगळ साइड इफेक्ट्स पसरवण्याचा प्रयत्न करताहेत. त्या व्हायरसचा आणि या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

    मुंबई : न्यायालयाने सशर्त जामीन दिल्यानंतर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी पत्रपरिषदेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ‘आदरार्थी’ असा उल्लेख केला होता. तथापि, एका संमेलनात सहभाग झालेल्या मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या या उपरोधिक ‘सन्मान’जनक वक्तव्याकडे सपेशल दुर्लक्ष करीत त्यांचे नाव न घेताच ‘जुना व्हायरस’ असा उल्लेख केला. गेल्या दोन दिवसांच्या वादळी घडामोडीनंतर प्रथमच ठाकरे यांनी जुन्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे, असा राणे यांना सूचक इशाराही दिला.

    कोरोनाचे संकट खरेच गेलेय का हे कळायला मार्ग नाही. अजूनही हे संकट पुरते गेलेले नाही. नवे व्हायरस येत आहेतच, पण काही जुने व्हायरसही परत आले आहेत. हे जुने व्हायरस वेगवेगळ साइड इफेक्ट्स पसरवण्याचा प्रयत्न करताहेत. त्या व्हायरसचा आणि या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

    केंद्रीय मंत्री राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यभर उमटले होते. शिवसेना व भाजपा या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यामंध्ये तुफान राडाही झाला होता. त्यानंतर राणेंविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी अटकही केली होती. तथापि कोर्टाच्या आदेशानंतर त्यांची सुटकाही झाली होती. या सर्व घडामोडीत उद्धव ठाकरे मात्र शांतच होते. गुरुवारी एका संमेलनात त्यांनी भाग घेतला आणि कोरोनाच्या मुद्यावरून राणेंचे नाव टाळत त्यांना सूचक इशाराही दिला.