सावधान : राज्यात मागील 24 तासांत 131 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू, मुंबईच्या बालगृहातील 18 मुलं करोनाबाधित

मुंबईतील मानखुर्द येथील बाल गृहात रविवारी मुलांची कोरोना चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये 18 मुले कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. या आधी तीन दिवसांपुर्वी मुंबई सेंट्रल येथील एका बालिका अनाथ आश्रमातील 15 बालिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तर, मोठ्या प्रमाणात कोविड बाधीत लहान मुले आढळण्याची आठवड्यातील दुसरी घटना असल्याने राज्याची चिंता वाढली आहे.

  महाराष्ट्रात मागील 24 तासांत कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 4,666 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर, 131 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील एकुण बाधितांची संख्या 64,56,939 इतकी झाली आहे. तर, 1,37,157 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

  आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील 3,510 रुग्णांना कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 62,63,416 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात कोविड रुग्णांचा दर 97 टक्के आहे, आणि संक्रमणाचा दर 2.12 टक्के इतका आहे. तर, सध्या 52,844 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  बालगृहातील 18 मुलांना कोरोनाची लागण

  मुंबईतील मानखुर्द येथील बाल गृहात रविवारी मुलांची कोरोना चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये 18 मुले कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार या सर्व मुलांना वाशी नाका येथील कोविड सेंटरमधील आयसोलेशन वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे.

  या आधी तीन दिवसांपुर्वी मुंबई सेंट्रल येथील एका बालिका अनाथ आश्रमातील 15 बालिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तर, मोठ्या प्रमाणात कोविड बाधीत लहान मुले आढळण्याची आठवड्यातील दुसरी घटना असल्याने राज्याची चिंता वाढली आहे.