9 ते 12 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा; यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

निश्चित तारखेच्या दोन दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून आणि पूर्वमोसमी पावसास झालेली सुरुवात या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मुंबई महानगरासह कोकणातील सर्व जिल्ह्यात 9 ते 12 जून या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दिले आहेत. अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

    मुंबई : निश्चित तारखेच्या दोन दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून आणि पूर्वमोसमी पावसास झालेली सुरुवात या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मुंबई महानगरासह कोकणातील सर्व जिल्ह्यात 9 ते 12 जून या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दिले आहेत. अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

    दरम्यान, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा तातडीने आढावा घ्यावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. अतिवृष्टी झाल्यास वीज पुरवठा खंडित होऊ शकतो हे लक्षात घेऊन रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, जनरेटर्स, डिझेलचा साठा, ऑक्सीजन चा साठा करून ठेवावा.

    वीजेचे बॅकअप कशा पद्धतीने घेता येईल याची पर्यायी व्यवस्था करून रुग्णसेवेत कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनादेखील मुख्यमंत्र्यांनी केल्या.

    हे सुद्धा वाचा