पुढील पाच दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, भारतीय हवामान खात्यानं वर्तवला अंदाज

पुढील पाच दिवस मुंबईत पावसाची स्थिती कायम राहणार असून मुंबईला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.  मुंबईतील अनेक रस्त्ये तुडुंब भरुन वाहत आहेत. अनेकांच्या घरातही पाणी शिरलं आहे. तर चेंबूर आणि विक्रोळीत दोन ठिकाणी इमारतीची भींत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.

    मुंबई:  रात्रभर कोसळणाऱ्या धुव्वाधार सरींमुळे मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाले आहेत, तर अनेक भागात पाणी साचलं आहे. आजही मुंबई, ठाणे, (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad), रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे.

    पुढील पाच दिवस मुंबईत पावसाची स्थिती कायम राहणार असून मुंबईला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.  मुंबईतील अनेक रस्त्ये तुडुंब भरुन वाहत आहेत. अनेकांच्या घरातही पाणी शिरलं आहे. तर चेंबूर आणि विक्रोळीत दोन ठिकाणी इमारतीची भींत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.

    या दुर्घटनेत २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अजून काहीजणं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आज सकाळपासूनच मुंबईसह ठाणे, पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे.