येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसह (Warning of torrential rain in Mumbai, Thane and Palghar districts) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. आजही (Today) मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याच्या मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर (K S Hosalikar ) यांनी दिली. त्यांनी ट्विटद्वारे याविषयी माहिती दिली आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईतील माटुंगा येथील भागांत रस्त्यावर पाणी साचले आहे. तसेच येथील संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.  रस्त्यावर पाण्याची तुंबई झाल्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

  • गेल्या पंधरा दिवसांत कमी अधीक कोसळणारा पाऊस (rains) आता परतीच्या प्रवासाला निघेल अस वाटत असतांना मंगळवार, बुधवार पावसानी दमदार (heavy rain) हजेरी लावली आहे. यामुळे परतीचा पाऊस पुन्हा सक्रीय (return rains stabilize) होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
  • महाडमध्ये पावसाने ३ हजार मिलिमीटरचा टप्पा केला पार

मुंबई :  मुंबई  (Mumbai) शहरांसह उपनगरांमध्ये काल मंगळवारी (Tuesday) संध्याकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy rains) मुंबईतील अनेक भागांत पाणी साचलं आहे. तसेच येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसह (Warning of torrential rain in Mumbai, Thane and Palghar districts) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. आजही (Today) मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याच्या मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर (K S Hosalikar ) यांनी दिली. त्यांनी ट्विटद्वारे याविषयी माहिती दिली आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रेल्वेसेवरही त्याचा परिणाम झाला आहे. चर्चगेट ते अंधेरी दरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं या स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. तर मध्य रेल्वे सुद्धा विस्कळीत झाली आहे. हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते वाशी वाहतूक बंद आहे. परंतु ठाणे-कर्जत, कसारा, वाशी-पनवेल, अंधेरी-विरार शटल सेवा सुरू आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेसेवा सुरू आहेत. आजही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे तसेच नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, सकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा येथे १२२.२ मिलीमीटर तर सांताक्रुझ येथे २७३.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

कोसळधार पावसामुळे मुंबईतील नायर हॉस्पिटल येथील परिसर जलमय झाला आहे. तसेच मागील २४ तासांत मुंबईत १७३ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात पाणी शिरल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले आहेत. त्याचप्रमाणे संसर्ग  पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने कार्यालयांना सुट्टी देण्याचे  आवाहन मुंबई पालिकेकडून  करण्यात आले आहे. तसेच कोकणात आणि उत्तर कोकणात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईतील धारावी आणि सायन येथील परिसर जलमय झाला आहे. तसेच संपूर्ण रस्त्यावर पाण्याची तुंबई झाल्यामुळे येथील नागरिकांना भरलेल्या पाण्यातून रस्ता क्रॉस करावा लागत आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात जोरदार पाऊस :

शिरूर अनंतपाळ तालुक्यात  काल मंगळवारी अतिवृष्टी झाल्याने मांजरा, घरणी नदीसह नाल्याकाठच्या सोयाबीनला या पावसाचा फटका बसला आहे. तसेच सोयाबीन सह खरिप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतजमीनी ही खरडून गेल्याने शेतक-यांंचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात ९० मिमी इतका पाऊस झाला. या अतिवृष्टीने तालुक्यात ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून खरिप हंगाम धोक्यात आले आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यात सोमवारी सायंकाळी पावसाने अक्षरश: तालुक्याला झोडपून काढले. आतापर्यंतच्या पावसाळ्यात हा सर्वांत मोठा पाऊस पडला असून ९० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई पालिकेच्या आपात्कालीन व्यवस्थापन विभागाने २२ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर २०२०  पर्यंतचा पावसाळी परीस्थितीचा अहवाल कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळा हवामान केंद्राने  जारी केला आहे. यामध्ये मागील २४ तासांमध्ये  मुंबई शहर आणि उपनगरांत सरासरी किती पाऊस पडला आणि पावसाची टक्केवारी जारी करण्यात आली आहे. यामध्ये कुलाबा वेधशाळा हवामान केंद्राने अहवालात वर्तवल्यानुसार, गेल्या २४ तासांत १४७.८ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच २२ सप्टेंबर पर्यंतचा एकूण पाऊस सरासरी ३१४८.३  इतका झाला आहे. वार्षिक सरासरी २२९२ इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २०१९ आणि २०२० ची टक्केवारी पाहिली असता, २०१९ मध्ये पावसाची सरासरी ११७.५४ ट्क्के आहे. तर २०२० मध्ये पावसाची एकूण टक्केवारी १३७.३ टक्के इतकी झाली आहे.

सांताक्रूझ हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मागील २४ तासांत २८६. ४ इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर २२ सप्टेंबर रोजी ३५७१.१ इतका मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरी पाहिली असता, २६६८ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच मागील वर्षांपेक्षा यंदाच्या वर्षात अधिकपटीने पाऊस पडला आहे. तसेच मनपाच्या स्वयंचलित केंद्राने मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे  या भागांत मागील २४ तासांत किती मिमी आणि सरासरी पाऊस पडला. याची नोंद करण्यात आली आहे.

तापमान :

कुलाबा – कमाल २८.२ इतके आहे. तर किमान २५.० इतके आहे.

सांताक्रूझ – कमाल २७.५ इतके आहे. तर किमान २४.६ इतके आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे मुंबईतील सातही धरणं पाण्याने भरली आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. यामधील तुळसी तलाव, विहार तलाव, मोडक सागर तलाव, भातसा, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा ही सात तलावं पाण्याच्या क्षमतेने पूर्णपणे भरली आहेत. तसेच जल अभियंता विभागाकडून २३ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ६.०० वाजता तलावांच्या पाणी पातळीबाबतचा तपशील सादर करण्यात आला आहे.

वरील अहवालात मुंबई शहर आणि उपनगरांत सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे दादर, परळ, सायन, कुर्ला आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच सर्व विभागीय सहाय्यक आयुक्तांमार्फत पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रकारे घर आणि भिंतींच्या तक्रारी, झाडे आणि फांद्या पडण्याच्या तक्रारी, शॉर्टसर्किट, वाहतुक व्यवस्था आणि दरड कोसळणे अशा प्रकारच्या तक्रारी  पडताळणी करिता संबंधित विभागांना कळविण्यात आलेल्या आहेत. तसेच संबंधित विभागामार्फत मदतकार्य रवाना करण्यात आले आहेत.