राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; NDRF ची 15 पथके तैनात

महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यानंतर एनडीआरएफच्या 15 पथकांन विविध भागात तैनात करण्यात आले आहे. एनडीआरएफचे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी याबाबत माहिती दिली. 4 पथके रत्नागिरी, मुंबई, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड आणि ठाणे येथे प्रत्येकी दोन तर एक पथक कुर्ला येथे तैनात करण्यात आल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारच्या विनंतीवरूनच या पथकांची तैनाती करण्यात आली आहे.

    मुंबई : महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यानंतर एनडीआरएफच्या 15 पथकांन विविध भागात तैनात करण्यात आले आहे. एनडीआरएफचे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी याबाबत माहिती दिली. 4 पथके रत्नागिरी, मुंबई, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड आणि ठाणे येथे प्रत्येकी दोन तर एक पथक कुर्ला येथे तैनात करण्यात आल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारच्या विनंतीवरूनच या पथकांची तैनाती करण्यात आली आहे.

    हवामान खात्याने राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. एनडीआरएफच्या एका पथकात 47 कर्मचारी असतात. त्यांच्याकडे बोटी, लाकडी खांब कापण्याची यंत्रणा आणि पाऊस तसेच पूरग्रस्त भागात पीडितांवर प्राथमिक उपचारांची कीटही असते. मुंबईत बुधवारी मुसळधार पाऊस झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचले होते व रेल्वे सेवाही विस्कळीत झाली होती. हवामान खात्याने मुंबई, शेजारील टाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्टही जाहीर केला आहे.

    हे सुद्धा वाचा