विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई (Mumbai) , ठाणे-नवी मुंबईसह (Thane) अनेक भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतली असली तरी विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 मुंबई : येत्या २४ तासांत विदर्भ (Vidarbha ) , मराठवाडा (Marathwada) आणि कोकणातील (Kokan) अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा इशारा (Warning of torrential rains) हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबई (Mumbai) , ठाणे-नवी मुंबईसह (Thane) अनेक भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतली असली तरी विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी मनमाड, येवला, भागात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. या पावसामुळे अनेक परिसरातील शेतीला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलक्या-मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई-ठाण्यासह उपनगरांमध्ये ऊन आणि ढगाळ वातावरण राहिल असा अंदाज आहे.