परमबीर सिंह यांच्या विरोधात वारंट जारी!

या अगोदर देखील परमबीर सिंह यांना चांदीवाल आयोगानं चौकशीसाठी बोलावले होते, मात्र सिंह काही चौकशीला हजर राहिले नाहीत. मात्र जेव्हा आयोगाकडून शेवटची सुनावणी झाली तेव्हा आयोगानं कठोर भूमिका घेतली आणि सांगितले होते की, जर पुढील सुनावणीला सिंह हजर झाले नाहीत तर त्यांच्या विरोधात वारंट जारी करण्यात येईल. आज सिंह यांना चांदीवाल आयोगासमोर हजर रहायचं होतं, मात्र ते हजर राहिले नाहीत. त्यानुसार त्यांच्या वारंटची कारवाई करण्यात आली आहे.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात चांदीवाल आयोगाकडून वारंट जारी करण्यात आलंय. हे वारंट बेलेबल वारंट आहे. चांदीवाल आयोगाकडून ५० हजार रुपयांचे बेलेबल वारंट जारी करण्यात आलं आहे. तसंच आयोगानं महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांना आदेश दिले आहेत की, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची हे वारंट देण्यासाठी नियुक्ती करावी .

    या अगोदर देखील परमबीर सिंह यांना चांदीवाल आयोगानं चौकशीसाठी बोलावले होते, मात्र सिंह काही चौकशीला हजर राहिले नाहीत. मात्र जेव्हा आयोगाकडून शेवटची सुनावणी झाली तेव्हा आयोगानं कठोर भूमिका घेतली आणि सांगितले होते की, जर पुढील सुनावणीला सिंह हजर झाले नाहीत तर त्यांच्या विरोधात वारंट जारी करण्यात येईल. आज सिंह यांना चांदीवाल आयोगासमोर हजर रहायचं होतं, मात्र ते हजर राहिले नाहीत. त्यानुसार त्यांच्या वारंटची कारवाई करण्यात आली आहे.

    परमबीर सिंह यांचे अनिल देशमुख यांच्यावर आरोप

    सचिन वाझे प्रकरणात बदलीच्या कारवाईनंतर नाराज झालेल्या परमबीर सिंह यांनी उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसूलीचे आरोप लावले होते. हायकोर्टात या प्रकरणी एक याचिका दाखल झाली होती. त्यानूसार सीबीआयद्वारे चौकशीचे आदेश देखील देण्यात आले होते. राज्य सरकारनं देखील सेवानिवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. ही समिती या संपूर्ण प्रकरणाची समांतर चौकशी करतेय