महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी फोन टॅपिंगचं षडयंत्र रचण्यात आलं काय? ; रोहित पवारांचा सवाल

मविआ सरकारला बदनाम करण्यासाठीच 'फोन टॅपिंग'चं षडयंत्र रचण्यात आलं काय, अशी शंका या अहवालावरून येतेय. तसंच अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय गोळ्या झाडण्याची अशी प्रथा पडली तर भविष्यात प्रशासनाला काम करणंही अवघड होईल, असे रोहित पवार यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे. रोहित पवार यांनी दोन ट्विट करुन फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

    मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप होतं आहेत. सचिन वाझे प्रकरणापासून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापत आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी फोन टॅपिंग प्रकरणातील अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. मात्र, हा अहवाल कुंटे यांनी तयार केलाच नसावा, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. याचं पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

    “राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेला अहवाल मंत्र्यांनी तयार करून त्यावर मुख्य सचिवांनी केवळ स्वाक्षरी केल्याचे काही ‘अनुभवी’ नेत्याचं म्हणणे आहे. म्हणून भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का,असा प्रश्न मला पडला. पण हे सरकार व मुख्य सचिव असं करणार नाही याची खात्री आहे”, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. तर मुख्य सचिवांच्या अहवालातील अनेक बाबी धक्कादायक आहेत. मविआ सरकारला बदनाम करण्यासाठीच ‘फोन टॅपिंग’चं षडयंत्र रचण्यात आलं काय, अशी शंका या अहवालावरून येतेय. तसंच अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय गोळ्या झाडण्याची अशी प्रथा पडली तर भविष्यात प्रशासनाला काम करणंही अवघड होईल, असे रोहित पवार यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे. रोहीत पवार यांनी दोन ट्विट करुन फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

    देवेंद्र फडणवीस यांचा आरोप ?

    दरम्यान, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जो अहवाल दिला, तो त्यांनी तयारचं केलेला नाही. मी त्यांना ओळखतो, ते सरळमार्गी आहेत. हा अहवाल कदाचित जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला असावा आणि त्यावर मुख्य सचिवांनी स्वाक्षरी केली असावी, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.