Watching a Facebook video will make you smile and have a stomach ache

सोशल मिडीयावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक भजनी मंडळाचा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून हसून हसून पोट दुखेल.

    मुंबई : सोशल मिडीयावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक भजनी मंडळाचा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून हसून हसून पोट दुखेल.

    हा व्हिडिओ फेसबुकवर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. यात भजनात दंग झालेले एक भजमी मंडळ दिसत आहे. टाळ, हार्मोनियम, तबला आणि खुळखुळा अशा वाद्यांचा पावर करत हे भजनी मंडळ भजन सादर करत आहे.

    मात्र, या व्हिडिओची गंमत म्हणजे खुळखुळा वादकाचा उत्साह आणि टाळ वाजवणाऱ्याची चपळाई. या दोघांचे एक्सप्रेशन पाहून हा व्हिडिओ पाहणारे पोट धरुन हसत आहेत.

    हे भजनी मंडळ नेमकं कुठलं आहे याबद्दल काहीच माहिती नाही. पण, हा व्हिडिओ फेसबुकवरील अनेक ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओवर भन्नाट कमेंट्सचा वर्षावही होत आहे.