संपूर्ण मुंबईत २२ डिसेंबरला पाणीकपात

येत्या २२ आणि २३ डिसेंबरला संपूर्ण मुंबईत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याचे महापालिका जल अभियंता विभागाने जाहीर केले आहे. येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईंटची दुरुस्ती तसेच घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथे मुख्य जलवाहिनीवरील झडप बदलण्याच्या कामांमुळे येत्या २२ आणि २३ डिसेंबरला संपूर्ण मुंबईत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याचे महापालिका जल अभियंता विभागाने जाहीर केले आहे.

येत्या २२ आणि २३ डिसेंबरला संपूर्ण मुंबईत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याचे महापालिका जल अभियंता विभागाने जाहीर केले आहे. येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईंटची दुरुस्ती तसेच घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथे मुख्य जलवाहिनीवरील झडप बदलण्याच्या कामांमुळे येत्या २२ आणि २३ डिसेंबरला संपूर्ण मुंबईत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याचे महापालिका जल अभियंता विभागाने जाहीर केले आहे. यामध्ये घाटकोपर, विद्याविहार या ‘एन’ व कुर्ला ‘एल’ विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील असे जल अभियंता विभागाने कळवले आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या २७५० मिलीमीटर व्यासाच्या ऊर्ध्व वैतरणा जलवाहिनीवर आग्रा रोड व्हॉल्व संकुल (ARVC) ते पोगावदरम्यान, येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईंटच्या दुरुस्तीचे काम २२ डिसेंबर २०२० रोजी हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये मंगळवार, २२ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजेपासून बुधवार २३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजेपर्यंत २४ तासांच्या कालावधीत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

काही ठिकाणी पूर्णत: कपात
तसेच मंगळवार, २२ डिसेंबर २०२० रोजी ‘एन’ विभागामध्ये घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथे कप्पा १ला पाणीपुरवठा करणाऱ्या १४०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील १४०० मिलीमीटर व्यासाची झडप बदलण्याचे काम नियोजित आहे. हे काम मंगळवार २२ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० पासून बुधवार, २३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे या दोन्ही विभागात मंगळवारी पाणीपुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात करण्यात येईल. तर ‘एन’ व ‘एल’ विभागातील काही भागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. मुंबईकरांनी या पाणीकपात कालावधीत पाण्याचा साठा करावा आणि पाणी जपून वापरावे असे आवाहन जल अभियंता विभागाने केले आहे.

अशी असेल पाणीकपात
शहर भाग : ए, बी, सी, डी, ई, जी/उत्तर व जी/दक्षिण – १५ टक्के

पश्चिम उपनगरे : संपूर्ण पश्चिम उपनगरे (एच/पूर्व, एच/पश्चिम, के/पूर्व, के/पश्चिम, पी/उत्तर, पी/दक्षिण, आर/उत्तर, आर/मध्य, आर/दक्षिण) – १५ टक्के पूर्व उपनगरेः एल, एन, एस – १५ टक्के

घाटकोपर भागातील या भागात पूर्णतः पुरवठा बंद
एन विभाग : – प्रभाग क्रमांक १२३, १२४, १२६, १२७, १२८, १३० मधील आनंदगड, शंकर मंदीर, राम नगर, हनुमान मंदीर, राहूल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, वर्षानगर, जय मल्हार नगर, खंडोबा टेकडी, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षानगर टाकी(वर्षानगर येथील शोषण टाकी व उदंचन केंद्रामार्फत वितरण होणारा संपूर्ण परिसर), डी आणि सी महापालिका वसाहत, रायगड विभाग, गावदेवी पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरा नगर २, अमीनाबाई चाळ, कातोडी पाडा, भीम नगर, इंदिरा नगर १, अल्ताफ नगर, गेल्डा नगर, जगदुशा नगर, गोळीबार मार्ग, सेवा नगर, ओ.एन.जी.सी. वसाहत, माझगांव डॉक वसाहत, गंगावाडी प्रवेशद्वार क्रमांक २, अंशतः विक्रोळी पार्क साईट परिसर(आनंदगड शोषण टाकी व उदंचन केंद्राद्वारे वितरण परिसर), सिद्धार्थ नगर, साईनाथ नगर आणि पाटीदारवाडी, भटवाडी, बर्वे नगर, काजू टेकडी, न्यू दयासागर व रामजी नगर इत्यादी – पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.

कुर्ल्यात इथे नाही पाणी
एल विभाग – प्रभाग क्रमांक १५६, १५८, १५९, १६०, १६१, १६४ मधील संघर्ष नगर, खैराणी मार्ग, यादव नगर, जे. एम. एम. मार्ग, लक्ष्मीनारायण मंदीर मार्ग, कुलकर्णी वाडी, सरदारवाडी, डिसूझा कंपाऊंड, अय्यप्पा मंदीर मार्ग, मोहिली पाईपलाइन, लोयलका परिसर, परेरावाडी, इंद्र मार्केट, भानुशाली वाडी, असल्फा गाव, एन.एस.एस. मार्ग, नारायण नगर, साने गुरुजी पंपिंग, हिल नंबर ३, भीम नगर, आंबेडकर नगर, अशोक नगर, हिमालय सोसायटी, वाल्मिकी मार्ग, नुराणी मस्जिद, मुकुंद कंपाऊंड, संजय नगर, समता नगर, गैबण शाह बाबा दर्गा मार्ग इत्यादी – पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.