मुंबईकरांसाठी खूशखबर, धरणांतील पाणीसाठा ९८ टक्क्यांवर

गेल्या काही महिन्यांपासून पावसाने (Heavy Rain) जोरदार हजेरी लावल्यामुळे मुंबईतील सातही धरणं (Dams) पाण्याने भरली आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा हा ९८ टक्क्यांवर गेला असून मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. यामधील तुळसी तलाव, विहार तलाव, मोडक सागर तलाव, भातसा, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा ही सात तलावं पाण्याच्या क्षमतेने पूर्णपणे भरली आहेत.

मुंबई महापालिकेच्या (BMC) आपात्कालीन व्यवस्थापन विभागाने २३ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२० पर्यंतचा पावसाळी परीस्थितीचा (Monsoon Report) अहवाल कुलाबा (Colaba) आणि सांताक्रूझ (Santa cruz) वेधशाळा हवामान केंद्राने जारी केला आहे. यामध्ये मागील २४ तासांत मुंबई शहर (Mumbai City)  आणि उपनगरांतील सरासरी पाऊस आणि पावसाची टक्केवारी (The percentage of rain) जारी करण्यात आली आहे. कुलाबा वेधशाळा हवामान केंद्राने अहवालात वर्तवल्यानुसार, गेल्या २४ तासांत ५०.४ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच २३ सप्टेंबर पर्यंतचा एकूण पाऊस सरासरी ३१९८.७ इतका झाला आहे. वार्षिक सरासरी २२९२ इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २०१९ आणि २०२० मध्ये पावसाची टक्केवारी पाहिली असता, २०२० मध्ये पावसाची एकूण टक्केवारी १३९.५६ टक्के इतकी झाली आहे.

सांताक्रूझ हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मागील २४ तासांत १०८.७ इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर २३ सप्टेंबर रोजी ३६७९.८ इतका मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरी पाहिली असता, २६६८ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच मागील वर्षांपेक्षा यंदाच्या वर्षात अधिकपटीने पाऊस पडला आहे. तसेच मनपाच्या स्वयंचलित केंद्राने मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या भागांत मागील २४ तासांत किती मिमी आणि सरासरी पाऊस पडला. याची नोंद करण्यात आली आहे.

तापमान :

कुलाबा – कमाल २६.२ आणि किमान २३.७ इतके तापमान आहे.

सांताक्रूझ – कमाल २६.७ आणि किमान २३.८ इतके तापमान आहे.

हवामानाचा अंदाज :

कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरिता वर्तवलेल्या अंदाजानुसार शहर व उपनगरांत आकाश सर्वसाधारणत: ढगाळ राहून अधूनमधून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाच्या काही सरी तीव्र असण्याची शक्यता आहे.

धरणांतील पाणीसाठा ९८ टक्क्यांवर :

गेल्या काही महिन्यांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे मुंबईतील सातही धरणं पाण्याने भरली आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा हा ९८ टक्क्यांवर गेला असून मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. यामधील तुळसी तलाव, विहार तलाव, मोडक सागर तलाव, भातसा, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा ही सात तलावं पाण्याच्या क्षमतेने पूर्णपणे भरली आहेत.

वरील अहवालात मुंबई शहर आणि उपनगरांत सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे महत्त्वाच्या शहरांमध्ये पाणी साचण्याच्या तक्रारी काल बुधवारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर आज काही ठिकाणी साचलेल्या पाण्याचा पूर्णपणे निचरा करण्यात आला असून सद्यस्थितीत कोठेही पाणी साचल्याची तक्रार नाही. तसेच घर आणि भिंतींच्या तक्रारी, झाडे आणि फांद्या पडण्याच्या तक्रारी, शॉर्टसर्किट, वाहतुक व्यवस्था आणि दरड कोसळणे अशा प्रकारच्या तक्रारी पडताळणी करिता संबंधित विभागांना काल कळविण्यात आलेल्या आहेत. परंतु आज मुंबई पालिकेने सादर केलेल्या अहवालानुसार मुंबई आणि उपनगरातील वाहतुक सुरळीत आहे आणि संबंधित विभागामार्फत मदतकार्य रवाना करण्यात आले आहेत.