water

मुंबईतील काही भागांत पाईपलाईनच्या दुरूस्तीची कामं करण्यात येणार असून मंगळवारी सकाळी ८.३० ते रात्री १०.३० पर्यंत पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेकडून नागरिकांना पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

  मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. या पावसामुळे अनेक रस्ते आणि विभाग जलमय झाले असून अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. मात्र, मुसळधार पाऊस पडूनही मुंबईत १५ टक्के पाणीकपात होणार असल्याचं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. जलवाहिन्यांच्या दुरूस्तीचे काम निघाल्यामुळे येत्या आठवड्यातील मंगळवारी पाणी कपात करण्यात येणार आहे.

  मुंबईतील काही भागांत पाईपलाईनच्या दुरूस्तीची कामं करण्यात येणार असून मंगळवारी सकाळी ८.३० ते रात्री १०.३० पर्यंत पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेकडून नागरिकांना पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी कशी करणार कामे ?

  सुरळीत पाणी पुरवठय़ासाठी भूमिगत जलवाहिन्यांच्या जोडण्यांसह झडपा बसवणे, फ्लो मीटर बसवणे अशी कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये एफ उत्तर शीव-माटुंगा आणि एफ दक्षिण प्रभाग, लालबाग-परळ वगळता सर्व विभागांत १५ टक्के पाणीकपात होणार आहे.

  कोणत्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार?

  अंधेरी पश्चिम-स्वामी विवेकानंद रोड, गुलशन नगर, आर.एम. मार्ग गिल्बर्ट हिल, जुहू कोळीवाडा, क्रांतीनगर, विलासनगर, शक्तीनगर, कदमनगर, आनंदनगर, पाटलीपुत्र, चार बंगला, वीरा देसाई रोड, मोरगाव, यादवनगर, कॅ. सावंत मार्ग, जोगेश्वरी स्टेशन मार्ग, सहकार मार्ग, बांदिवली टेकडी या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

  याशिवाय अंधेरी पूर्व-बांद्रेकरवाडी, फ्रान्सिस वाडी, मखरानी पाडा, सुभाष मार्ग, चाचानगर, वांद्रे प्लॉट, हरीनगर, शिवाजी नगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी, पंप हाऊस, विजय राऊत मार्ग, पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली टेकडी, आशीर्वाद चाळ, जुना नागरदास मार्ग, मोगरपाडा, न्यू नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग आणि विलेपार्ल्याच्या बहुतांश भागातही पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

  water supply cut in mumbai approximetely 15 percent by the bmc nrms