मुंबई पालिकेचे युद्ध पातळीवरचे प्रयत्न कामी आले, भांडुप जलशुुद्धीकरण संकुलातील पाणी पुरवठा पूर्ववत

भांडुप जलशुद्धीकरण(Bhandup Water Purification Project) संकुल परिसरात मुसळधार पावसाचे(Rain) पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे तसेच विद्युत पुुरवठा यंत्रणा बंद करावी लागली होती.

    मुंबई : भांडुप(Bhandup Water Purification Project) जलशुुद्धीकरण संकुलातील नवीन आणि जुन्‍या अशा दोन्‍ही उदंचन केंद्रातील यंत्रणा कार्यान्‍व‍ित झाली असून काल संध्याकाळपासून पाणी पुरवठा(Water Supply Resume) टप्‍प्‍याटप्‍प्‍याने पूर्ववत करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या जलाभियंता विभागाने दिली आहे.

    भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे तसेच विद्युत पुुरवठा यंत्रणा बंद करावी लागली होती. यामुळे मुंबईच्या बहुतांश भागांधील पाणीपुरवठा काल बाधित झाला होता. भांडुप जलशुद्धीकरण संकुलात शिरलेले पावसाचे पाणी अक्षरशः युद्ध पातळीवर उपसून गाळणी व उदंचन यंत्रणा परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली. संबंधित संयंत्राची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्‍यात आली. यानंतर सर्व तांत्रिक कार्यवाही करून उदंचन करणारे पंप टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सुरु करण्‍यात आले.त्यामुळे सायंकाळपासून पश्चिम उपनगरांसह शहर भागातील अनेक भागांमध्‍ये पाणीपुुरवठा पूर्ववत करण्यात आला.

    वांद्रे, खारदांडा, अंधेरी पूर्व येथील मोगरापाडा, पार्ले पूूर्व परिसर, अंधेरी पश्चिम विभागातील यारी रोड, मढ, गांधीनगर, गोरेगाव बिंबीसार परिसर, कांदिवली वि‍भागातील ठाकूर संकूल, लोखंडवाला संकूल, दहिसर परिसर, तुळशीपाईप मार्ग, सेनापती बापट मार्ग परिसर, एन. एम. जोशी मार्गावर दादर ते भायखळा, दादर, माहिम, धारावी, पेडर रोड, भुुलाभाई देसाई मार्ग, ताडदेव, महालक्ष्‍मी, कुलाबा, कफ परेड अशा निरनिराळ्या भागांमध्‍ये टप्‍प्‍याटप्‍प्‍याने पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती जलाभियंता विभागाने दिली. नागरिकांनी पाणी उकळून नंतर प्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.