प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट जीवघेणी ठरली. कोरोनाच्या हाहाकारामुळे जगभरात 17 कोटी रुग्ण बाधित झाले तर लाखो लोकांचा मृत्यूही झाला. संसर्ग रोखण्यासाठी जगातील प्रत्येक देशाने आटोकाट प्रयत्नही केले. आता दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोकाही वाढला आहे. ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठीच लहान मुलांसाठी लसीच्या चाचणीलाही सुरुवात झाली आहे. तथापि याबाबत समोर आलेल्या एम्सच्या अहवालात लसीच्या चाचणीपूर्वीच 50% लहान मुले बाधित झाल्याचे समोर आल्याने संकटात भरच पडली आहे.

  दिल्ली : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट जीवघेणी ठरली. कोरोनाच्या हाहाकारामुळे जगभरात 17 कोटी रुग्ण बाधित झाले तर लाखो लोकांचा मृत्यूही झाला. संसर्ग रोखण्यासाठी जगातील प्रत्येक देशाने आटोकाट प्रयत्नही केले. आता दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोकाही वाढला आहे. ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठीच लहान मुलांसाठी लसीच्या चाचणीलाही सुरुवात झाली आहे. तथापि याबाबत समोर आलेल्या एम्सच्या अहवालात लसीच्या चाचणीपूर्वीच 50% लहान मुले बाधित झाल्याचे समोर आल्याने संकटात भरच पडली आहे.

  पालकही अनभिज्ञ

  मुलांना कोरोना झाल्याची कल्पना पालकांनाही नव्हती. या सर्व मुलांमध्ये मोठ्या लोकांप्रमाणे श्वास घेण्यास त्रास, फुफ्फुसात संसर्ग, घशात संसर्ग यासारखी कोरोनाची गंभीर लक्षणे नव्हती. तर केवळ सर्दी, खोकला आणि ताप आला होता, असेही या सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. लस चाचणीसाठी ज्या व्यक्तींची निवड केली जाते त्यांची आरोग्य तपासणीसह कोरोना चाचणीही केली जाते. एम्समध्ये ज्या लहान मुलांवर चाचणी करण्यात आली होती त्यापैकी बहुतांश मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

  10 शहरांत सर्व्हेक्षण

  देशात मोठ्या प्रमाणात लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच बरीच मुलं अशी होती ज्यांना कोरोना झाला होता मात्र, त्यांना त्याबद्दल माहिती नव्हती, असे एम्सतर्फे करण्यात आलेल्या एका सर्व्हेक्षणात उघड झाले आहे. हे सर्व्हेक्षण देशातील 10 शहरांमध्ये करण्यात आले होते.

  संसर्ग सौम्य पण…

  मुलांना सौम्य संसर्ग होतो हे निश्चित आहे. मात्र, ते गंभीर झाल्यास लसीचा किती फायदा होऊ शकतो, याची माहिती मिळवणे गरजेचे असल्याचे मत एम्सच्या लसीकरण मोहीमेचे प्रमुख डॉ. संजय राय म्हणाले. या मुलांच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण गरजेचे असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

  5 वर्षाखालील मुलांना मास्क आवश्यक नाही

  कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहू जाता सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. याबाबत केंद्र सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांमध्ये पाच वर्षाखालील मुलांना मास्क घालणे आवश्यक नसल्याचे म्हटले आहे. सहा ते 11 वर्ष वयोगटातील मुले मास्क घालू शकतात परंतु त्यासाठी केवळ आईवडिलांची देखरेख आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही निर्देशात म्हटले आहे. याशिवाय वयस्कांसाठी मास्क आवश्यकच असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

  रेमडेसिविरचा वापर नको

  नव्या नियमानुसार कोरोना संसर्ग झालेल्या मुलांवर सिटी स्कॅनचा उपयोग हा समजदारी करावा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाअंतर्गत डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्स सर्विसने या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एसिम्पटोमॅटिक आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी स्टेरॉइडचा वापर हा घातक असल्याचे म्हटले आहे.

  बँकेत दिवसाढवळ्या दरोडा