वाझे प्रकरणाचे सत्य विधानसभेत भाजपने समोर आणल्यानेच मुख्यमंत्र्याना अधिवेशनाचा धसका : भाजपा कार्यकारीणीत चंद्रकांत पाटील यांचे टिकास्त्र

पहिल्या दिवसांपासून या सरकारचा सामान्य माणासाशी कसलाही संबंध राहिला नाही, उद्या जाणार म्हणून आज कमाई करून घ्या या भावनेतून हे सरकार चालले आहे त्यामुळे अनिर्णयताआणि भ्रष्टाचाराचा हैदोस सुरु आहे. अश्या वेळी कोविड स्थितीमध्ये लोकांना घरात बंद करून ठेवून आपण आपले राज्य चालवू हा सरकारचा समज होता मात्र भारतीय जनता पक्षाने बिकट काळातही अनेक आंदोलने करत सरकारला सळो की पळो करून सोडले आहे असे पाटील म्हणाले.

    मुंबई : या सरकारच्या दोन मंत्र्यांना त्यामुळे घरी पाठवण्यात यश आले. मागच्या अधिवेशनात एका विषयावर सभागृह नऊ वेळा बंद पडले त्यावेळी वाझे नावाच्या पोलीस अधिका-याला जणू तो सरकारचा जावई असल्याप्रमाणे वाचविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि सरकारने चालविला होता, पण आज सत्य काय आहे ते जगासमोर आणण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे. त्यामुळेच आता या सरकारला अधिवेशन घेण्याची भिती वाटली असून एक दिवसापेक्षा जास्त कामकाज न घेण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे अशी टिका भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

    काहीतरी मोठी अडचण या सरकारमध्ये आहे

    ते म्हणाले की, जो माणूस आजारी नसतो त्याला रोज मला काही झाले नाही मी बरा आहे असे सांगावे लागत नाही. तसेच या सरकारचे आहे हे सरकार जर पाच वर्ष चालणार आहे तर मग रोज सकाळी उठून हे सात त्याने का सांगत बसावे लागते की हे सरकार चालणार आहे आणि पाच वर्ष चालणार आहे, याचाच अर्थ काहीतरी मोठी अडचण या सरकारमध्ये आहे.

    उद्या जाणार म्हणून आज कमाई करून घ्या

    ते म्हणाले की पहिल्या दिवसांपासून या सरकारचा सामान्य माणासाशी कसलाही संबंध राहिला नाही, उद्या जाणार म्हणून आज कमाई करून घ्या या भावनेतून हे सरकार चालले आहे त्यामुळे अनिर्णयताआणि भ्रष्टाचाराचा हैदोस सुरु आहे. अश्या वेळी कोविड स्थितीमध्ये लोकांना घरात बंद करून ठेवून आपण आपले राज्य चालवू हा सरकारचा समज होता मात्र भारतीय जनता पक्षाने बिकट काळातही अनेक आंदोलने करत सरकारला सळो की पळो करून सोडले आहे असे पाटील म्हणाले.

    दोन मंत्र्याना घरी पाठवण्यात यश

    ते म्हणाले की या सरकारच्या दोन मंत्र्याना त्यामुळे घरी पाठवण्यात यश आले. मागच्या अधिवेशनात एका विषयावर सभागृह नऊ वेळा बंद पडले त्यावेळी वाझे नावाच्या पोलीस अधिका-याला जणू तो सरकारचा जावइ असल्याप्रमाणे वाचविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि सरकारने चालविला होता, पण आज सत्य काय आहे ते जगासमोर आणण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे.

    न्यायालयाने कंटाळून विरोधात निकाल दिला

    ते म्हणाले की मराठा आरक्षणाच्या वेळी १९ तारखा मिळाल्यानंतरही या सरकारने मागासवर्ग आयोगाचा अहवाल भाषांतर करून दिला नाही त्यामुळे न्यायालयाने कंटाळून विरोधात निकाल दिला आहे. मात्र हे सरकार आम्ही तेच वकील दिल्याचे पालुपद लावते असे सांगत पाटील म्हणाले की, पाच लाखाचा वकील असला तरी मूळ मालकाने त्याला न्यायालयात काय करायचे याचे मार्गदर्शन करायला हवे ते या सरकारने केलेच नसल्याने दोन्ही आरक्षणाच्या विषयात पेच निर्माण झाला अहे