सचिन वाझेंचा गॉडफादर कोण? नितेश राणेंचा शिवसेनेवर खळबळजनक आरोप

यासर्व प्रकरणात वरुण सरदेसाई यांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. वरुण सरदेसाईंचे आणि वाझेंचे संभाषण महत्त्वाचं आहे. मुंबई पोलिसांनी आयपीएलच्या रॅकेटचा पदार्फाश केला. वाझेंनी IPL खेळाडूंकडे 150 कोटींची खंडणी मागितली असल्याचा दावाही नितेश राणेंनी केलाय.

    मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरणात एपीआय सचिन वाझेंना अटक झाली आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे ठाकरे सरकार अडचणीच सापडले असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सचिन वाझे यांचा गॉडफादर कोण? असा सवाल उपस्थित करत भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर खळबळजनक आरोप केले आहेत.

    यासर्व प्रकरणात वरुण सरदेसाई यांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. वरुण सरदेसाईंचे आणि वाझेंचे संभाषण महत्त्वाचं आहे. मुंबई पोलिसांनी आयपीएलच्या रॅकेटचा पदार्फाश केला. वाझेंनी IPL खेळाडूंकडे 150 कोटींची खंडणी मागितली असल्याचा दावाही नितेश राणेंनी केलाय.

    एनआयएने वरूण सरदेसाई यांचे सीडीआर तपासावे, व्हॉट्सअॅप कॉल तपासावेत. वाझे यांच्या मागे कोणाची ताकद आहे? वाझेंचा गॉडफादर कोण आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे वाझेंची वकिली का करीत आहेत, हे त्यानंतरच कळेल, असेही नितेश राणे म्हणाले.

    एक साधा API अशापद्धतीची भूमिका घेतो. तो कोणाचा नातेवाईक आहे, ही देखील चौकशी झाली पाहिजे. वाझेचा गॉडफादर कोण? वरुण सरदेसाईंना कोणी सांगितले. हा सर्व तपास झाला पाहिजे. उद्धव ठाकरे वाझेंची वकिली का करत होते याचे उत्तर मिळालेच पाहिजे अशी मागणीही नितेश राणेंनी केली.