वाझेने केला ‘नंबर वन’ चा उलगडा! 70 लाख वसुलीचा उलगडा झाल्याचा ईडीच्या अहवालात दावा

या प्रकरणात ईडीने बारमालकांचेही जबाब नोंदविले आहेत. बार मालकांकडून पैसे घेताना हे पैसे नंबर वन यांना द्यायचे आहेत, असे वाझे सांगत असे, परंतु नाव मात्र सांगत नसे. तथापि ईडीच्या चौकशी त्याने हे नाव उघड केले असल्याचे समजते. नंबर वन म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेच असल्याचे वाझेने आपल्या जबाबात सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  मुंबई : अँटिलियासमोरील स्फोटके प्रकरण, मनसुख हिरेन हत्याकांड या प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलिस निरीक्षक सजिन वाझेची ईडीने तळोजा कारागृहात सतत तीन दिवस कसून चौकशी केली. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटी वसुली प्रकरणातही त्याची चौकशी करण्यात आली असून चौकशी दरम्यान देशमुखांचे सचिव पलांडे व शिंदे यांच्यासोबत त्याची समोरासमोरही चौकशी करण्यात आली.

  या चौकशीचा अहवाल तयार करण्यात आला असून या अहवालात वाझेने ज्या ‘नंबर वन’कडे वसुलीची रक्कम पोहोचविली जात होती त्याचे नाव उघड केल्याचा दावा ईडीने केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली वाझेची चौकशी तूर्तास ईडीने थांबविली असल्याची माहिती सूत्राने दिली.

  संशयाची सुई देशमुखांकडे

  या प्रकरणात ईडीने बारमालकांचेही जबाब नोंदविले आहेत. बार मालकांकडून पैसे घेताना हे पैसे नंबर वन यांना द्यायचे आहेत, असे वाझे सांगत असे, परंतु नाव मात्र सांगत नसे. तथापि ईडीच्या चौकशी त्याने हे नाव उघड केले असल्याचे समजते. नंबर वन म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेच असल्याचे वाझेने आपल्या जबाबात सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  70 लाख वसुलीचा उलगडा

  दरम्यान, वाझेने ईडी अधिकाऱ्यांना सहकार्य केल्याचं ईडीच्या सूत्रांनी सांगितल. हा सर्व पुरावा ईडीचे अधिकारी देशमुख यांच्याविरोधात वापरण्याच्या तयारीत आहेत. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा गंभीर आरोप केला होता. यासोबतच 100 कोटी पैकी चार कोटी 70 लाख रुपयांच्या रोख रखमेचा ईडीच्या तपासात खुलासा झाला आहे. बाकी रक्कम कुठून गोळा झाली, कोणी गोळा केली, ती रक्कम कोणाला देण्यात आली, याचा तपास ईडीचे अधिकारी करत आहेत.