”ताज”चे आम्ही कायमचे ऋणी ; निवासी डॉक्टरांनी व्यक्त केली कृतज्ञता

- निवासी डॉक्टरांनी व्यक्त केली कृतज्ञता -पर्यायी जेवण व्यवस्थेची धुरा सामाजिक संस्था आणि केइएम कॅन्टीनच्या खांद्यावर -आरोग्य कर्मचाऱ्यांना ताज हॉटेलकडून जेवण पुरवठा शनिवार पासून बंद

-पर्यायी जेवण व्यवस्थेची धुरा  सामाजिक संस्था आणि केइएम कॅन्टीनच्या खांद्यावर

-आरोग्य कर्मचाऱ्यांना ताज हॉटेलकडून जेवण पुरवठा शनिवार पासून बंद झाले 

नीता परब, मुंबई : हॉटेल ताजकडून सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांसह हेल्थकेअर कर्मचाऱ्यांना मोफत जेवण पुरवण्यात येत होते. २३ मे पासून हे जेवण पुरवठा बंद करण्यात आले. गेले दोन महिने न चुकता ताज जेवण पुरवत असल्याने निवासी डॉक्टरानी कृतज्ञता व्यक्त केली आहे.मात्र रविवार पासून जेवणाचे काय हा प्रश्न डॉक्टरांसमोर आ वासुन उभा होता, परंतु यावरही मार्ग काढण्यात आला असून “”प्रोजेक्ट मुंबई” ही सामाजिक संस्था पुढे आली आहे, याच्या मदतीला केइएम रुग्णालयातील कॅन्टीनच ही जेवण देण्याकरीता सहभाग असणार आहे.

मुंबईत कोरोनामुळे युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. यात सरकारसह सामाजिक संस्थाही मदतीला धावून आल्या.  या युद्धात अत्यावश्यक सेवेतील आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांचा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे क्षेत्र अत्यंत महत्वाचे‌ असल्याने ताज हॉटेलने यांच्या नाश्ता तसेच जेवणाचा प्रश्न मागील काही दिवसांपासून  सोडवला. दरररोज नाश्ता तसेच जेवण ताज मधून येत असल्याचे निवासी डॉक्टर सांगतात. 

हे जेवण शनिवार पासून बंद करण्यात आले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना घरचे जेवण आणावे लागणार आहे. पालिका रुग्णालयांच्या कँटीन  आहेत. मात्र बहुतांश कँटींनमधील कर्मचारी क्वारंटाईन अथवा बाधित झाल्याने  नियमानुसार बंद करण्यात आल्या आहेत.

ज्यामुळे डॉक्टरांना जेवणाबाबतचा प्रश्न भेड़सावत होता, पण यावर निवासी डॉक्टराची संघटना मार्ड आणि के इएम रुग्णालय प्रशासनाने एकत्रितपणे  हा प्रश्न सोडविण्यात आला असल्याची माहिती केइएम रुग्णालय मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ दिपक मुंडे यांनी सांगितले.रविवार पासून प्रोजेक्ट मुंबई ही सामाजिक संस्था आणि केईएम् रुग्णालयातील कन्टीन यांच्या मदतीने निवासी डॉक्टरांना सकस जेवण पुरविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

“हॉटेल ताजकडून दुपारी १२ ते सायंकाळी ६.३० या काळात जेवणाची पाकिटे दिली जात होती. त्यात डाळ भात, भाजी, फळे, केक आणि स्वीट असे पदार्थ दिले जात होते. ताजकडून दिली जाणारी ही जेवणाची पाकिटे सर्वांना रोज वेळेवर पोहोचत होती.  ज्यामुळे शनिवारी ‘आम्ही ताज हॉटेलकडून आलेल्या जेवणाच्या गाड़ीचे टाळ्या वाजवून स्वागत केले, शिवाय जेवण पुरवल्याबाबत मार्ड संघटना ताजची कायमची ऋणी राहिल.तसेच यापुढे देण्यात येणाऱ्या जेवणाचा प्रश्न केइएम रुग्णालय प्रशासनच्या मदतीने सोडविण्यात आला आहे.”

 डॉ. दीपक मुंडे,‌ अध्यक्ष, केईएम मार्ड