aknath khadse and uddhav thackeray

तिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या वृत्तावर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. 'चांगली गोष्ट आहे. खडसे महाविकास आघाडीच्या कुटुंबात येत असतील तर आनंद आहे'. असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Aknath Khadse) यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, खडसे हे शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अधिकृतरीत्या घोषणा केली आहे.

अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या वृत्तावर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. ‘चांगली गोष्ट आहे. खडसे महाविकास आघाडीच्या कुटुंबात येत असतील तर आनंद आहे’. असं मुख्यमंत्री म्हणाले. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजप-शिवसेनेची युती तुटली होती. हा निर्णय घेणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये एकनाथ खडसेंचं नाव सर्वात पुढे होतं. यानंतर शिवसेना आणि खडसेंचे संबंध बिघडले. त्यामुळेच खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिवसेना काय प्रतिक्रिया देणार याची उत्सुकता होती. खडसेंना राष्ट्रवादीकडून कृषिमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे.