आम्ही तयार आहोत, पण लसी कुठे आहेत? महापौर किशोरी पेडणेकरांचा सवाल

मुंबईत १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाची तयारी झाल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. प्रत्येक वॉर्डासाठी एक लसीकरण केंद्र द्यायचं ठरवलं, तर केंद्रांची संख्या वाढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवाय खासगी रुग्णालयांनादेखील लसीकरण करण्याची परवानगी देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र हे सगळं कऱण्यासाठी लसी उपलब्ध होणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. 

    देशात दररोज ३ लाखांपेक्षा अधिक रुग्ण सापडत असताना १ मे पासून देशभरात १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण मोहिम सुरू करण्याची घोषणा करण्यात आालीय. मात्र प्रत्यक्षात लसी उपलब्ध होत नसल्याची तक्रार सर्व स्तरातून करण्यात येत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील लसीकरणाबाबत साशंकता व्यक्त केलीय.

    मुंबईत १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाची तयारी झाल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. प्रत्येक वॉर्डासाठी एक लसीकरण केंद्र द्यायचं ठरवलं, तर केंद्रांची संख्या वाढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवाय खासगी रुग्णालयांनादेखील लसीकरण करण्याची परवानगी देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र हे सगळं कऱण्यासाठी लसी उपलब्ध होणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

    लसीकरणाची सर्व तयारी केली, मात्र लसीच उपलब्ध झाल्या नाहीत, तर नागरिकांचा हिरमोड होईल आणि तयारीसाठीचं मनुष्यबळदेखील एक प्रकारे वाया जाईल, अशी साशंकता त्यांनी व्यक्त केलीय. नागरिकांनी लस उपलब्ध असल्याची खातरजमा करूनच येण्याची विनंती त्यांनी केलीय.

    राज्यात सध्या ४५ वर्षावरील नागरिकांचं लसीकरण सुरू आहे. त्यातील बहुतांश नागरिकांना आता दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया थांबवून १८ वर्षांवरील नागरिकांना लस देणं योग्य होणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयानंतरच १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकऱणाची घोषणा केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलंय.