sanjay raut

औरंगाबादचे नाव संभाजी नगर झालेय असे आम्ही जाहीर करतो असे म्हणत संजय राऊत यांनी नामांतरावर अघोषीतपणे शिक्कामोर्तब केले आहे. सरकारी कागदपत्रांवर तसेच ट्विटरवर औरंगाबादचा संभाजी नगर असा उल्लेख केला जात आहे. संभाजी महाराजांचं नाव वापरणं हा गुन्हा नाही असे मोठ वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे.

मुंबई : औरंगाबादचं ‘संभाजीनगर’ असं नामांतर करण्याचा वाद सध्या गाजत आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचा नामांतरास विरोध आहे. असे असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी औरंगाबादच्या नामांतराबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.

औरंगाबादचे नाव संभाजी नगर झालेय असे आम्ही जाहीर करतो असे म्हणत संजय राऊत यांनी नामांतरावर अघोषीतपणे शिक्कामोर्तब केले आहे. सरकारी कागदपत्रांवर तसेच ट्विटरवर औरंगाबादचा संभाजी नगर असा उल्लेख केला जात आहे. संभाजी महाराजांचं नाव वापरणं हा गुन्हा नाही असे मोठ वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे.

औरंगाबादचा मुद्द्यावर त्यांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं. त्यात काँग्रेसच्या विरोधाचाही मुद्दा होता. मात्र, काँग्रेस मनातून सकारात्मक आहे, असं ते म्हणाले. नामांतर हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नसला तरी लोकभावनेचा आदर करून एखादा निर्णय घ्यायचा नाही असंही राऊत म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिवशी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं अशी मागणी शिवसेना नेते चंदक्रांत खैरे यांनी केली आहे.
दरम्यान, महाआघाडी सरकारच्या अजेंड्यावर हा विषय नाही, असं म्हणत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी नामांतरचा विरोध स्पष्टपणे जाहीर केला. मात्र, या नंतरही शिवसेनेकडून शासकीय पातळीवर संभाजीनगर असा उल्लेख होत राहिला आहे. यावरुन काँग्रेसकडून सातत्याने शिवसेनेला लक्ष्य केले जात होते.

‘वर्षानुवर्षं आम्ही संभाजीनगर असाच उल्लेख करत आलो आहोत आणि पुढेही तेच करणार. बाळासाहेबांनीही हाच उल्लेख केला होता’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “औरंगजेब सेक्युलर नव्हता. त्यामुळे आमच्या कॉमन अजेंड्यामध्ये जो सेक्युलर शब्द आहे, त्यात औरंगजेब बसत नाही असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटलय.

औरंगजेब हा विषय नाही. छत्रपती संभाजी महाराज हे आमचेही आराध्यदैवत आणि श्रद्धास्थान आहे. पण प्रश्न असा आहे की, नामांतराच्या बाबतीत जे राजकारण होते, त्यामुळे माणसात भेद निर्माण होतात. ते होऊ नये यासाठी काँग्रेस विरोध करत असतं,” असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.