अधिकारी ओळखण्यास आपण कमी पडलो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सोडले मौन, रश्मी शुक्ला यांच्या चौकशीची मंत्र्यांनी केली मागणी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या पैसे वसुलीचा आरोप आणि गुप्तचर विभगाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांचा उघड झालेला फोन टॅपिंग अहवालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

    मुंबई : अधिकारी ओळखण्यास आपण खरेच कमी पडलो. आता जे झाले ते झाले. ज्यांनी चुका केल्या त्या विश्वासघातकी अधिकाऱ्यांना जरुर शिक्षा करु. पण, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सरकारवर जे धांदात खोटे आरोप होत आहेत, त्याविरोधात आघाडी म्हणून तिन्ही पक्षांनी एकत्र लढले पाहिजे आणि त्यांचे बिनबुडाचे आरोप खोडून काढले पाहिजेत, अशी साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घातली.

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या पैसे वसुलीचा आरोप आणि गुप्तचर विभगाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांचा उघड झालेला फोन टॅपिंग अहवालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

    परिणामी, आजची मंत्रिमंडळाची बैठक वादळी झाली. मंत्र्यांनी फोन टॅपिंगबाबत जोरदार संताप व्यक्त केला. तसेच रश्मी शुक्ला यांच्या चौकशीची एकमुखी मागणी केली. त्यावेळी प्रथमच मुख्यमंत्र्यांनी या विषयावर मत व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.