सरकारकडे नैतिकता शिल्लक आहे का हे विचारावे लागेल – फडणवीस यांचे टिकास्त्र

हे जनतेच्या मनातील सरकार नाहीये. हे बेईमानीने आलेले तीन पायाचे सरकार आहे. दीड वर्षानंतर त्याचा अनुभव आता जनता घेत आहे. या राज्यामध्ये एका मुख्यमंत्र्याऐवजी सगळेच स्वत:ला मुख्यमंत्री समजतात.  हे सरकार तीन पायाचं असून ते तिन्ही पक्ष वेगवेगळ्या दिशेने जात आहेत, त्याचा त्रास येथील जनता भोगत आहे.

    मुंबई: अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सवाल केला आहे की सरकारकडे नैतिकता शिल्लक आहे का हे विचारावे लागेल, राजीनामा झाला असला तरी एका गोष्टीचे कोडे आहे. इतक्या भयावह घटना राज्यात झाले. कधी नव्हे तेवढे आरोप मंत्र्यांवर लागले. मात्र, अजूनही मुख्यमंत्री अजूनही बोलत नाहीत. अजूनही मुख्यमंत्री शांत आहेत. हे अस्वस्थ करणारे आहे. त्यांची प्रतिक्रिया यायला हवी होती.

    मुख्यमंत्री का बोलत नाहीत

    फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्याची शेवटची प्रतिक्रिया मला आठवतेय. ते म्हणाले होते, ;’की वाझे काय लादेन आहे का?’ , त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर अजूनही मुख्यमंत्री का बोलत नाहीत, हा माझा सवाल आहे. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. त्यांनी चूक सुधारु असे सांगणे अपेक्षित आहे, असे फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, नैतिकता आधीच आठवायला हवी होती. मात्र, नैतिकता कधीजरी आठवली तरी त्यांचे स्वागतच केले पाहीजे, असेही फडणवीस म्हणाले.

    .

    बेईमानीने आलेले तीन पायाचे सरकार

    मी आधीच म्हणालो होतो की, हे जनतेच्या मनातील सरकार नाहीये. हे बेईमानीने आलेले तीन पायाचे सरकार आहे. दीड वर्षानंतर त्याचा अनुभव आता जनता घेत आहे. या राज्यामध्ये एका मुख्यमंत्र्याऐवजी सगळेच स्वत:ला मुख्यमंत्री समजतात.  हे सरकार तीन पायाचं असून ते तिन्ही पक्ष वेगवेगळ्या दिशेने जात आहेत, त्याचा त्रास येथील जनता भोगत आहे.अनिल देशमुख वसुलीचे टार्गेट प्रकरणात अनेक नावं समोर येतील. आगामी काळात पुराव्यासहित अनेक गोष्टी बाहेर येतील. त्यामध्ये सर्व काही स्पष्ट होईल, असेही फडणवीस म्हणाले संजय राऊतांची परिस्थिती सहनही होत नाही, सांगताही येत नाही अशी झाली आहे. त्यामुळे ते मला काही माहिती नाही, मला काही सांगता येणार नाही, अशा प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.