आम्ही पैसे देतो, आम्हाला लस खरेदी करून द्या; आरोग्यमंत्री टोपेंची केंद्राला विनंती

कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून जी लसीकरण मोहीम हाती घेतली आहे, ती आता काही राज्यात लसीच्या तुटवड्यामुळे बंद पडताना दिसत आहे. यामुळे केंद्र सरकारने लसीकरणासाठी राष्ट्रीय धोरण जाहीर करावे. 18 चे 4 वर्षे वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी जर राज्यांकडे असेल तर आम्ही तुम्हाला पैसे देतो, आम्हाला लस खरेदी करून द्या, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारला केले आहे.

    मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून जी लसीकरण मोहीम हाती घेतली आहे, ती आता काही राज्यात लसीच्या तुटवड्यामुळे बंद पडताना दिसत आहे. यामुळे केंद्र सरकारने लसीकरणासाठी राष्ट्रीय धोरण जाहीर करावे. 18 चे 4 वर्षे वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी जर राज्यांकडे असेल तर आम्ही तुम्हाला पैसे देतो, आम्हाला लस खरेदी करून द्या, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारला केले आहे.

    त्याचबरोबर कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला असून त्याबद्दलच्या सूचनाही देण्यात आल्या असल्याचे टोपे यांनी सांगितले. लसींच्या ग्लोबल टेंडरसंदर्भात बोलताना ते म्हणाले.

    अद्याप कोणत्याही राज्याच्या लसींच्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे केंद्राने लसीकरणासंदर्भात राष्ट्रीय धोरण जाहीर करावे, असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.