सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आम्हाला आदर : उदय सामंत

सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात निर्णय दिला आहे, पण परीक्षा पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे, अंतिम वर्षाच्या परीक्षा कधी घ्यायच्या हा निर्णय राज्य सरकार घेईल. सप्टेंबर महिन्यात या परीक्षा घेता येणार नाहीत, असे आम्ही कोर्टापुढे अगोदरच सांगितलं आहे. त्यामुळे, युजीसीकडे विनंती करण्याबाबत लवकरच ठरवू, असं उदय सामंत यांनी म्हटले आहे.

मुंबई : विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंबंधी (Final Year Exams) आज शुक्रवार सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. परिक्षांची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता परीक्षा होणारचं असं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आम्हाला आदर असल्याचं उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात निर्णय दिला आहे, पण परीक्षा पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे, अंतिम वर्षाच्या परीक्षा कधी घ्यायच्या हा निर्णय राज्य सरकार घेईल. सप्टेंबर महिन्यात या परीक्षा घेता येणार नाहीत, असे आम्ही कोर्टापुढे अगोदरच सांगितलं आहे. त्यामुळे, युजीसीकडे विनंती करण्याबाबत लवकरच ठरवू, असं उदय सामंत यांनी म्हटले आहे.

लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न असल्यानं न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागलं होतं. आज सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी निकाल दिला. तसेच अंतिम वर्षाची परीक्षा घेतल्याशिवाय राज्यांना विद्यार्थ्यांना प्रमोट करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिला आहे.