आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांचे कार्यकर्ते फोडतोच, त्यासाठी आम्हाला फुल्ल परवानगी, पण…   हसन मुश्रीफ यांचा दावा

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्यासाठीच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून ‘तो’ पत्रप्रपंच करण्यात आल्याचा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केला आहे. भाजपाकडून हा कट रचला जात आहे. भाजपाकडून सुडाचं राजकारण सुरू आहे. शिवसेनेचे वाघ अशा धमक्यांना घाबरणारे नाहीत. भाजपाकडून ज्या धमक्या दिल्या जात आहेत, त्याला शिवसेना घाबरणार नाही, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

    कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्यासाठीच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून ‘तो’ पत्रप्रपंच करण्यात आल्याचा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केला आहे. भाजपाकडून हा कट रचला जात आहे. भाजपाकडून सुडाचं राजकारण सुरू आहे. शिवसेनेचे वाघ अशा धमक्यांना घाबरणारे नाहीत. भाजपाकडून ज्या धमक्या दिल्या जात आहेत, त्याला शिवसेना घाबरणार नाही, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

    काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यास परवानगी, पण…

    आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांचे कार्यकर्ते फोडतोच, त्यासाठी आम्हाला फुल्ल परवानगी आहे. परंतु शिवसेनेला हात लावायचा नाही हे आमचे ठरलेले आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले. सरनाईक यांनी असा आरोप केला असला तरी राज्यात कुठेही तशी परिस्थिती नाही. कोल्हापूर जिल्हापरिषद गोकुळमध्ये शिवसेनेला संधी दिली. काही ठिकाणी स्थानिक प्रश्नावरून कुरबुरी झाल्या असतील याचा अर्थ फोडाफोडी चालली आहे असा नाही. सरनाईक यांचे हे कारण जुजबी असावे, असे देखील सरनाईक म्हणाले.

    महाविकास सरकार 25 वर्षे टिकेल

    सरनाईक यांनी शिवसेनेने भाजपशी जुळवून घेतलेले बरे यावर आपण काही बोलणार नाही, तो त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, त्यांनी सत्तेत राहून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते सेनेमधील नेते फोडून आपला पक्ष कमकुवत करत असल्याबाबत म्हटले आहे. राज्यात असे काहीही घडत नाही. उलट तिन्ही पक्षांमध्ये चांगल्या पद्धतीने समन्वय सुरू असून जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र आहेत, तोपर्यंत आपल्या महाविकास आघाडीला कोणत्याही पद्धतीचा धोका नसून पुढचे 25 वर्ष आघाडी अशीच टिकून राहील, असा विश्वासही मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला.

    हे सुद्धा वाचा