uddhav thackeray big statement on railway

सरकार मुंबईमध्ये लोकलच्या फेऱ्या वाढवून मागत आहे. राज्यांतर्गत रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. राज्यातील लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्याही फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. तसेच आपण लोकल वाहतुक सुरु करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु कोरोना हा परदेशी पाहुणा हातपाय पसरतो आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्व नियम पाळण्याची गरज आहे. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. हे खरे आहे. परंतु नागरिकांनी अजूनही नियम पाळणे गरजेचे आहे.

मुंबई : मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यावर राज्यातील सर्व रेल्वे आणि मुंबईतील लोकल (local to start) सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सर्वसमान्य नागरिकांना लोकल प्रवासाला बंदी आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray’) यांनी आज जनतेशी संवाद साधला यावेळी लोकल सुरु करण्याबाबत वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, (statement regarding local) लोकलच्या फेऱ्या सरकार वाढवत आहेत.

सरकार मुंबईमध्ये लोकलच्या फेऱ्या वाढवून मागत आहे. राज्यांतर्गत रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. राज्यातील लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्याही फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. तसेच आपण लोकल वाहतुक सुरु करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु कोरोना हा परदेशी पाहुणा हातपाय पसरतो आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्व नियम पाळण्याची गरज आहे. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. हे खरे आहे. परंतु नागरिकांनी अजूनही नियम पाळणे गरजेचे आहे. काही नागरिक हलगर्जीपणा करत आहेत. मास्क वापरताना दिसत नाहीत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री

शेतकऱ्यांवर आस्मानी संकट आले आहे. त्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. याकडेपण सरकारचे लक्ष आहेस शेतकऱ्यांनी खचून जावू नये. सरकार सर्व नुकसानग्र्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत देत आहे. सरकारनं विकेल ते पिकेल धोरणाला मंजुरी दिली आहे. ज्याला हमखास भाव मिळेल, ते पिकवण्याचा आपल्या सरकारचा आग्रह आहे. महा-ओनियन हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत शीतगृहं आणि गोदामं दिली जातील. असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

केंद्राच्या कृषी कायद्याविषयी सरकार विचार करत आहे. या कायद्यातील जे बरोबर असेल त्याचा स्वीकार करू, पण अयोग्य असेल तर ते स्वीकारलं जाणार नाही. शेतकरी नेते, संघटना या सगळ्यांशी चर्चा सुरू आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.