रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी; ठाण्यासह कोल्हापुरात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे शहरांत हलक्या सरींचा पाऊस कोसळत आहे. तर दुसरीकडे, आजपासून पुढील पाच दिवस कोकण, घाट परिसर मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र ते विदर्भापर्यंत पावसाने हजेरी लावली आहे. परंतु पुढील 3 दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

    गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे शहरांत हलक्या सरींचा पाऊस कोसळत आहे. तर दुसरीकडे, आजपासून पुढील पाच दिवस कोकण, घाट परिसर मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं आज पुणे, रायगड आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.