सुप्रसिद्ध दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे उपचारादरम्यान निधन

  • रजत मुखर्जी यांना किडनीच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यामुळे बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. लॉकडाऊनमुळे रजत मुखर्जी जयपूर येथे होते. रजत मुखर्जी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मित्र आणि अभिनेता मनोज वाजपेयी याने भावनात्मक ट्वीट करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

मुंबई – बॉलिवूडसाठी २०२० हे वर्ष दुःखदायक झाले आहे. बॉलिवूडने २०२० च्या सुरुवातापासुनच अनेक दिग्गजांना गमावले आहे. शनिवार (दि १८ जुलै) ला ‘प्यार तुने क्या किया’  रोड, उम्मीद, लव इन नेपाल यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे निधन झाले आहे. रजत मुखर्जी यांनी जयपुरमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांना किडनीच्या समस्येने ग्रासले होते. 

रजत मुखर्जी यांना किडनीच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यामुळे बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. लॉकडाऊनमुळे रजत मुखर्जी जयपूर येथे होते. रजत मुखर्जी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मित्र आणि अभिनेता मनोज वाजपेयी याने भावनात्मक ट्वीट करुन श्रद्धांजली वाहिली आहे. 

अभिनेता मनोज वाजपेयीनं लिहिले आहे की, माझा मित्र आणि रोडचे दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे आज सकाळी सुरुवातीच्या काळात जयपूरमध्ये आजारपणाच्या प्रदीर्घ लढाई नंतर निधन झाले !!! शांततेत विश्रांती रजत !! तरीही आम्ही विश्वास ठेवू शकत नाही की आम्ही कधीच आपल्या कामांना भेटणार नाही आणि पुन्हा चर्चा करणार नाही.खुश रे जाहा भी रे. आशा आशयाचे ट्विट केले आहे.