अजित पवारांची वकिली करायला गेले अन् इज्जतीचा कचरा केला; निलेश राणेंची संजय राऊतांवर टीका

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या बोचऱ्या टीकेनंतर संजय राऊत अजित पवारांची पाठराखण करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, निलेश राणेंनी आता संजय राऊतांनाच कोंडीत पकडले आहे. “अजित पवारांची वकिली करायला गेले आणि त्यांच्या इज्जतीचा कचरा केला. संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?”, असा सवाल आता निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. निलेश राणे यांनी यावेळी ट्विट करून संजय राऊत यांना डिवचले आहे.

    मुंबई : राणे कुटुंबीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि कोणत्याही शिवसेना नेत्यावर कधीही टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत हे आता अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर, भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

    दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या बोचऱ्या टीकेनंतर संजय राऊत अजित पवारांची पाठराखण करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, निलेश राणेंनी आता संजय राऊतांनाच कोंडीत पकडले आहे. “अजित पवारांची वकिली करायला गेले आणि त्यांच्या इज्जतीचा कचरा केला. संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?”, असा सवाल आता निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. निलेश राणे यांनी यावेळी ट्विट करून संजय राऊत यांना डिवचले आहे.

    निलेश राणे संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका आपल्या ट्विटमध्ये म्हणाले कि, “संजय राऊत यांनी कधीच कोणाची वकिली करू नये. अजित पवारांची वकिली करायला गेले आणि त्यांच्या इज्जतीचा कचरा केला. अजित पवारांनी शपथविधीच्या समर्थनार्थ पत्र चोरलं पण टॉर्च मारला कोणी, हा प्रश्न विचारला होता. मुळात संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?’ दुसरं, म्हणे अजित पवार चिरीमिरी खात नाही”, असे देखील निलेश राणे म्हणाले आहेत.

    तसेचं राज्यात सध्या बहुचर्चित अशा ‘पहाटेच्या शपथविधी’वरून अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली होती. चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच या मुद्द्यावरून अजित पवार यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली होती. त्यावर संजय राऊतांनी अजित पवारांची पाठराखण केली होती.

    दरम्यान शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून ५४ आमदारांची यादी चोरणं ही नैतिकता आहे का ?”, असा बोचरा सवाल चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना केला. तर यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी अजित पवारांची पाठराखण केली. अजित दादा मोठ्या पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरीत असताना त्या काळोख्या खोलीत टॉर्चचा प्रकाश मारण्यासाठी व पत्र हाती येताच खिडकीतून पोबारा करण्यासाठी अजित पवारांबरोबर भाजपचे कोण कोण लोक होते? याचाही खुलासा आता व्हायला हवा’, असा सवाल संजय राऊतांनी केला होता. त्याच्यावरून निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.