सचिन वाझेंनी कोर्टात दाखल केलेले ‘ते’ तीन अर्ज कोणते? न्यायालयाने ते अर्ज का फेटाळले? नेमंक काय झालं कोर्टात?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेन याच्या अनाचक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून शनिवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली. त्यानंतकर एनआयए विशेष न्यायालयाने त्यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली. त्याविरोधात सचिन यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली असून सदर अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा करत आपल्याला वकिलांशीही भेटू दिले जात नसल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.

    मुंबई : अंबानी घराबाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरेन प्रकरणी अटक करण्यात आलेले आणि निलंबित गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचे तीन अर्ज मंगळवारी मुंबईतील एनआयए विशेष सत्र न्यायालयाने फेटाळून लावले.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेन याच्या अनाचक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून शनिवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली. त्यानंतकर एनआयए विशेष न्यायालयाने त्यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली. त्याविरोधात सचिन यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली असून सदर अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा करत आपल्याला वकिलांशीही भेटू दिले जात नसल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.

    एनआयए कार्यालयात सीसीटिव्ही नाही, वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याला अशाप्रकारे अटक करता येत नाही आणि एनआयएकडून अटकेची प्रक्रिया बेकायदेशी आहे, असे तीन अर्ज वाझे यांच्यावतीने दाखल करण्यात आले होते. त्यावर मंगळवारी पुन्हा न्या. कोथळीकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. त्याला एनआयएच्यावतीने तीव्र विरोध करण्यात आला. त्याची दखल घेत एनआयए न्यायालयाने वाझे यांनी केलेले तीन अर्ज फेटाळून लावले. मात्र, त्यांना वकिलांना भेटू देण्याची मागणी मान्य करण्यात आली असून त्यांच्या चौकशीदरम्यान वकिलांना तेथे हजर राहण्यास मूभाही न्यायालयाकडून यावेळी देण्यात आली.