मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या ‘त्या’ वक्तव्याला शरद पवारांचा पाठिंबा, काय म्हणाले? : वाचा सविस्तर

दोन पेक्षा अधिक मुल असेल तर कोणताही सरकारी लाभ दिला जाऊ नये, असंही योगी आदित्यनाथ यांनी  अधिकाऱ्यांना बजावलं आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त नागरिकांनी लोकसंख्या नियंत्रणात आपलं योगदान देण्याची शपथ खायला हवी. उत्तम देश आणि चांगलं जीवनमानासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवारांच्या पाठिंब्यानंतर इतर राज्ये देखील लोकसंख्या नियंत्रणाला पाठिंबा देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

    मुंबई : लोकसंख्येच्या बाबतीत सध्या भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सरकारी अहवालानुसार सध्या भारताची लोकसंख्या 132 कोटीच्या जवळ आहे. कमी क्षेत्रफळात जास्त लोकसंख्या असल्यानं भारतात ‘लोकसंख्याचा विस्फोट’ झाल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणात करणं गरजेचं आहे. याच हेतूने उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. लोकसंख्या वाढल्यास काय नुकसान होतं याबद्दल प्रत्येकाला सांगितलं पाहिजे. वाढती लोकसंख्या अनेक प्रश्नांचं मूळ आहे. यामुळे समाजात विषमता पसरते. चांगल्या समाजासाठी लोकसंख्या नियंत्रण आवश्यक आहे. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रत्येकाने लोकसंख्या नियंत्रणाची शपथ घेतली पाहिजे, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

    शरद पवार काय म्हणाले?

    दरम्यान दोन पेक्षा अधिक मुल असेल तर कोणताही सरकारी लाभ दिला जाऊ नये, असंही योगी आदित्यनाथ यांनी  अधिकाऱ्यांना बजावलं आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त नागरिकांनी लोकसंख्या नियंत्रणात आपलं योगदान देण्याची शपथ खायला हवी. उत्तम देश आणि चांगलं जीवनमानासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवारांच्या पाठिंब्यानंतर इतर राज्ये देखील लोकसंख्या नियंत्रणाला पाठिंबा देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

    तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये स्वातंत्र्यदिनी लाल किल्लावरून बोलताना लोकसंख्या विस्फोटावर नियंत्रण मिळवण्याची गरज असल्याचं पहिल्यांदा म्हटलं होतं. त्यानंतर या विषयावर कोणतीही चर्चा झाली नव्हती. आता लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकार प्रयत्न करत असल्यानं याचा सकारात्मक परिणाम निश्चित दिसून येऊ शकतो.