सिंहाच्या नव्हे उंदराच्या बिळाखाली येऊन दाखवलं, तुम्ही काय केलंत?; वरुण सरदेसाईंचा सवाल

मुंबईतील राणेंच्या बंगल्याजवळ युवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले असून भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले होते. यावेळी काहीप्रमाणात दगडफेक सुद्धा झाली असून यात काही पोलीस जखमी झाल्याचे देखील सांगितले जात आहे. दोन्ही बाजूने जोरदार घोषणा दिल्या जात असून मोठा तणाव सध्या त्याठिकाणी पाहायला मिळत आहे.

  मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप आमने-सामने आले आहेत. शिवसेनेचे नाशिकमधील शहाराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे.

  दरम्यान त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील राणेंच्या बंगल्याजवळ युवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले असून भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले होते. यावेळी काहीप्रमाणात दगडफेक सुद्धा झाली असून यात काही पोलीस जखमी झाल्याचे देखील सांगितले जात आहे. दोन्ही बाजूने जोरदार घोषणा दिल्या जात असून मोठा तणाव सध्या त्याठिकाणी पाहायला मिळत आहे.

  यावेळी वरुण सरदेसाई यांनी आक्रमक शैलीत राणे कुटुंबीयांना आव्हान दिले. नितेश राणे यांनी आम्हाला इकडे येऊन दाखवा, असे आव्हान दिले होते. सिंहाच्या नव्हे उंदराच्या बिळाखाली येऊन दाखवलं, तुम्ही काय केलंत? असा सवाल विचारत वरुण सरदेसाईंनी नितेश राणे यांना प्रतिआव्हान दिले.

  नितेश राणे यांनी मंगळवारी सकाळी एक ट्विट केले होते. माझ्या कानावर आलेल्या माहितीनुसार, युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. त्यामुळे एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे. अन्यथा पुढे काय घडले त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका. आम्ही तुमची वाट बघतोय, अशा शब्दांत नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले होते.

   राणे नेमकं काय म्हणाले होते ?

  ‘देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. ड्रायवरच नाही’, असे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.