शिवसेनेला शेतीतलं काय कळतं? तेवढी त्यांना अक्कलही नाही, भाजप नेते निलेश राणेंचा शिवसेनेवर घणाघाती प्रहार

भाजप नेते निलेश राणे यांनी म्हटले आहे की, शिवसेनेला शेतीतले काय कळतं? शेती हा शिवसेनेचा विषय नाही. शिवसेनेला तेवढी अक्कल नाही. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करण्यासाठी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. असे निलेश राणे यांनी म्हटले आहे. निलेश राणे रत्नागिरीत बोलत असताना अशी खरमरीत टीका शिवसेनेवर केली आहे.

मुंबई : केंद्र सरकारने (Central Government) लागू केलेल्या ३ कृषी कायद्यांविरोधात (Farmer Bill) शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. दिल्लीच्या सीमेवर (Delhi Border) मागील १५ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज भारत बंदची हाक दिली होती. या भारत बंदला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पाठिंबा दर्शवला होता. यावर भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. शिवसेनेला ( Shiv Sena ) शेतीतले काय कळते. केवळ मोदींना विरोध करायचा म्हणून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल आसल्याचे निलेश राणे (BJP leader Nilesh Rane) यांनी म्हटले आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी म्हटले आहे की, शिवसेनेला शेतीतले काय कळतं? शेती हा शिवसेनेचा विषय नाही. शिवसेनेला तेवढी अक्कल नाही. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करण्यासाठी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. असे निलेश राणे यांनी म्हटले आहे. निलेश राणे रत्नागिरीत बोलत असताना अशी खरमरीत टीका शिवसेनेवर केली आहे.

पुढे बोलताना निलेश राणे म्हणाले की, शिवसेना प्रचंड गोंधळलेला पक्ष त्यामुळे या पक्षाचा आता उतरता काळ सुरु झाला आहे. त्यामुळे त्यांची पतळी घसरु लागली आहे. दिल्लीतही शिवसेनेला कुणी किंमतही देत नाही. अलीकडच्या काळात शिवसेना कोणत्याही एका भूमिकेवर ठाम राहिली नाही. ते रोज खोटं बोलतात, एक दिवस महाराष्ट्राची जनताच शिवसेनेची दखल घेणं बंद करेल. त्यानंतर शिवसेना हा पक्षच अदखलपात्र ठरेल असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदा आणला त्यामुळे मोदींना विरोध करण्यासाठी राज्य सरकार आंदोलनाला पाठिंबा देत आहे. या कायद्याला फक्त पंजाब, हरियाणा राज्यातून जास्त विरोध आहे. नाहीत इतर राज्यांत अशी परिस्थिती नसल्याचेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.