The son murdered the father who was harassing the mother for money
प्रतीकात्मक फोटो

भारतीय कायदा व्यवस्थेत फाशी सर्वात मोठी शिक्षा मानली जाते. या शिक्षेविषयी आपल्याला फारशी माहिती नसते मात्र हिंदी सिनेमातून फाशीची शिक्षा सुनावली कि जज पेनाची निब मोडतात हे आपण पाहिलेले असते. असे करण्यामागे खास कारण आहे. ते म्हणजे एकदा फाशी सुनावल्यावर ती रद्द करण्याचा अधिकार त्या न्यायाधीशांना राहत नाही अथवा ते शिक्षेत बदल करू शकत नाहीत. पेनाची निब मोडणे म्हणजे त्या कैद्याचे आयुष्य संपले असे मानले जाते.

    दिल्ली : भारतीय कायदा व्यवस्थेत फाशी सर्वात मोठी शिक्षा मानली जाते. या शिक्षेविषयी आपल्याला फारशी माहिती नसते मात्र हिंदी सिनेमातून फाशीची शिक्षा सुनावली कि जज पेनाची निब मोडतात हे आपण पाहिलेले असते. असे करण्यामागे खास कारण आहे. ते म्हणजे एकदा फाशी सुनावल्यावर ती रद्द करण्याचा अधिकार त्या न्यायाधीशांना राहत नाही अथवा ते शिक्षेत बदल करू शकत नाहीत. पेनाची निब मोडणे म्हणजे त्या कैद्याचे आयुष्य संपले असे मानले जाते.

    या पेनाचा पुन्हा उपयोग नको म्हणून निब मोडले जाते. फाशी नेहमी सूर्योदयापूर्वी दिली जाते. यामागे बाकीच्या कैद्यांच्या कामावर परिणाम होऊ नये असा उद्देश असतो. तसेच फाशी देणारा जल्लाद कैद्याच्या कानात असे सागतो मला माफ कार. मी हुकुमाचा गुलाम आहे. मला शक्य असते तर तुझी मुक्तता होवो व तुला आयुष्य चांगल्या मार्गावर चालण्याची संधी मिळो अशी प्रार्थना केली असती.

    कायद्यानुसार कैद्याची फाशीची तारीख नक्की झाली की त्याअगोदर 15 दिवस त्याच्या नातेवाईकांना तशी कल्पना द्यावी लागते. फाशी साठी तयार केला जाणारा दोर बिहारच्या बक्सर तुरुंगात तयार केला जातो. ब्रिटीश काळापासून हीच व्यवस्था आहे. शेवटची इच्छा पूर्ण केल्यावरच गुन्हेगाराला फाशी दिले जाते. नॅशनल क्राईम रेकोर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2004 ते 2013 पर्यंत 1303 जणांना फाशी दिली गेले आहे.

    हे सुद्धा वाचा