एका पठ्ठ्यानं डोकं लढवत चक्क गायीलाच उभं केलं आणि तिच्या पोटाचा टीव्ही स्क्रिनसारखा वापर करून सिनेमा लावल्याचा हा अजब आणि मजेशीर जुगाड सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या गायीला आडवं उभं करून तिच्या पोटावर प्रोजेक्टरच्या मदतीनं सिनेमा लावला आहे. अख्खा गाव हा सिनेमा पाहण्यासाठी जमला आहे.
मुंबई : कोरोना विषाणूच्या (Corona Virus) काळात सोशल मीडियावर (Social Media) विविध प्रकारचे चित्र-विचित्र व्हिडिओ (Video) आणि फोटोज् (Photos) समोर आले. काल आपण बैलगाडीला कारची जोडी बनवलेली बघितली. पण आज चक्क हद्दच झालो ओ… २०२० अजून काय काय दाखवणार ते अजून पाहायचं राहिलंच आहे. सिनेमा म्हटलं की झोपलेला माणूस सुद्धा झोपेतून जागा होतो आणि सिनेमा (Cinema) पाहाणं कुणाला आवडत नाही. पूर्वीच्या काळात सिनेमा पाहण्यासाठी गावाकडची लोकं पांढऱ्या पडद्यावर टिव्ही स्क्रिनचा वापर करत होते. परंतु आता सिनेमा पाहण्यासाठी एक भन्नाट जुगाड करण्यात आला आहे.
फ़िल्म की दीवानगी और देसी जुगाड़ की पराकाष्ठा है! 😂
भगवान 2020 जल्द खत्म कर दो अब… 😅#JustForLaugh.
PC – Social Media
(Location – Unknown. May be Africa) pic.twitter.com/o43py4kpeM— Dipanshu Kabra (@ipskabra) December 24, 2020
एका पठ्ठ्यानं डोकं लढवत चक्क गायीलाच उभं केलं आणि तिच्या पोटाचा टीव्ही स्क्रिनसारखा वापर करून सिनेमा लावल्याचा हा अजब आणि मजेशीर जुगाड सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या गायीला आडवं उभं करून तिच्या पोटावर प्रोजेक्टरच्या मदतीनं सिनेमा लावला आहे. अख्खा गाव हा सिनेमा पाहण्यासाठी जमला आहे.
परंतु एक प्रश्न सर्वांना पडलाय, तो म्हणजे गाय एवढा वेळ एकाच जागी स्थिर कशी? एवढा भन्नाट जुगाड या पठ्ठयानं कसा केलं असेल. याची कल्पनाचं कोणी केली नसेल. दरम्यान, आयपीएस ऑफिसर दिपांशू काब्रा यांनी हा फोटो ट्वीट केला आहे. आतापर्यंत हा फोटो ५०० हून अधिक लोकांनी पाहिला असून ४५०हून अधिक लोकांनी लाईक केला आहे.