आर्यन खानच्या अटकेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर

मोठ्याचा मुलगा असो वा कुणाचाही मुलगा असो कायदा सर्वांना समान हे सर्वांनी लक्षात घेण गरजेचं आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

    मुंबई : एनसीबीनं एका क्रुझवर छापा मारत बॉलिवूडमधील एका बड्या अभिनेत्याच्या मुलासह 10 लोकांना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार क्रूझ टर्मिनलवरुन एक क्रूझ लक्ष्यद्वीपकडे जाणार होती. ज्यात एनसीबी अधिकाऱ्यांकडून छापा टाकण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हाती लागले असल्याची माहिती आहे.

    दरम्यान याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोठ्याचा मुलगा असो वा कुणाचाही मुलगा असो कायदा सर्वांना समान हे सर्वांनी लक्षात घेण गरजेचं आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

    एनसीबीने कारवाई केलेल्या क्रूझवर एक रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. दरम्यान एनसीबी अधिकारी समीर वानखेडे काही जणांना घेऊन एनसीबी कार्यालयात दाखल झाले असल्याची माहिती आहे.

    क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातून एनसीबीने आर्यनला अटक केली आहे. एनसीबी अधिकारी आर्यनला आता मुंबईच्या जे जे रुग्णालयात मेडिकलसाठी घेऊन गेले आहेत. तिथे त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे आर्यनने स्वत: आपल्या लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.