अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयावर जंयत पाटलांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून वाद चालू आहे. कर्नाटक सरकारने याबद्दल लवकरात लवकर अध्यादेश काढण्याची घोषणा देखील केली आहे. धरणाची उंची वाढवली तर त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. त्यामुळे धरणाची उंची वाढवायला महाराष्ट्रातील काही नेत्यांकडून विरोध दर्शवण्यात येत आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं कळालं आहे.

    मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून वाद चालू आहे. कर्नाटक सरकारने याबद्दल लवकरात लवकर अध्यादेश काढण्याची घोषणा देखील केली आहे. धरणाची उंची वाढवली तर त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. त्यामुळे धरणाची उंची वाढवायला महाराष्ट्रातील काही नेत्यांकडून विरोध दर्शवण्यात येत आहे.

    दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं कळालं आहे. या निर्णयाचा अभ्यास करण्याची सुचना मी जलसंपदा विभागाला दिली आहे. निष्कर्ष निघाल्यानंतर आवश्यकतेनुसार कर्नाटक सरकारशी चर्चा करू, असं पाटील यांनी सांगितलं आहे. तसेचं या प्रकरणाबाबत मी लवकरात लवकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. तसेच या अगोदरच मी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी सांगितलं होतं, असंही पाटील म्हणाले.

    दरम्यान, अलमट्टी या धरणाची उंची वाढवली तर कोल्हापूर आणि सांगलीत अनेकदा महापूर सारखी परिस्थिती बघायला मिळते. मागील काही वर्षात काही जिल्ह्यांना पूराचा भीषण फटका देखील बसला आहे. त्यामुळे राज्यातून धरणाची उंची वाढवण्याच्या बाबतीत जोरदार विरोध केला आहे.