विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी विरोधकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं? : वाचा सविस्तर

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकार इम्पेरीकल डाटा उपलब्ध व्हावा तसा ठराव मांडला. पण ठराव मांडू न दिल्यामुळे भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. भाजप आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे धाव घेतली आणि माईक खेचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभागृह 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

    मुंबई : विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली आणि विरोधकांनी सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं. ओबीसीच्या मुद्यावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. विरोधकांनी सभागृहात सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे.

    सभागृहात नेमकं काय घडलं?

    दरम्यान यानंतर सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकार इम्पेरीकल डाटा उपलब्ध व्हावा तसा ठराव मांडला. पण ठराव मांडू न दिल्यामुळे भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. भाजप आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे धाव घेतली आणि माईक खेचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभागृह 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

    भास्कर जाधव दालनकडे जात होते, तेव्हा भाजपच्या आमदारांनी त्यांना घेराव घातला. दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा केवळ राजकीय ठराव असल्याची टीका केली. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सात दिवसाची नोटीस देणे बंधनकारक आहे. आधी नियम स्थगित करायला हवा होता. जी सूचना आलेली आहे ती कायद्यात बसत नाही असं सांगत आक्षेप घेतला.