उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी बैठकीत नेमकं काय झालं?, संजय राऊत म्हणाले की…

सोनिया गांधी यांनी भाजप विरोधी मुख्यमंत्र्यांची आणि देशातील काही वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. आगामी निवडणुकांसाठी भाजप विरूद्ध रणनीती तयार करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हजेरी लावली होती. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील बैठकीत सामील झाले. दरम्यान या बैठकीत नेमकी काय चर्चा झालं यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे.

    मुंबई : सोनिया गांधी यांनी भाजप विरोधी मुख्यमंत्र्यांची आणि देशातील काही वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. आगामी निवडणुकांसाठी भाजप विरूद्ध रणनीती तयार करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हजेरी लावली होती. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील बैठकीत सामील झाले.

    दरम्यान या बैठकीत नेमकी काय चर्चा झालं यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे. आपण आता सध्या एक आहोत. आता खुर्ची दिसत नाही. पण जेव्हा खुर्ची दिसेल तेव्हा ही आपण एकत्रच राहू. त्यासाठी आपण लोकांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे असं बैठकीत उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे.

    सुमारे अडीच तास ही बैठक पार पडली, तर बैठकीत लोकशाही आणि महागाईच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं देखील राऊतांनी सांगितलं आहे. तसेचं जेव्हा बाबरी पडण्याचा प्रकार झाला तेव्हा पण सर्व जण पळून गेले होते. आम्ही तेच लोक आहोत. 1992 साली मुंबईत बाॅम्ब ब्लास्ट झाला त्या दंगलीत देखील शिवसेना पुढे आली होती. तेव्हा हे कुठे गेले होते? असा सवाल देखील संजय राऊतांनी भाजपला विचारला आहे. मुंबई दंगलीच्या वेळी हे लोकं घरात कडी लावून बसले होते आणि आज आम्हाला तालिबानी म्हणतात, अशी प्रत्यारोप देखील राऊतांनी केला आहे.

    दरम्यान, काही वर्षांपूर्वी काँग्रेससोबत युती नाही म्हणजे नाही म्हणारे उद्धव ठाकरे आता काँग्रेससोबत हातमिळवणी करण्यास तयार आहेत, अशी टीका आता उद्धव ठाकरे यांच्यावर केली जात आहे. तर भाजपने देखील उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात झालेल्या बैठकीवरून शिवसेनेवर घणाघाती टीका केली होती.