मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात येऊन काय दिवे लावणार आहेत?; नितेश राणेंची टीका

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन सर्व कारभार देवेंद्र फडणवीस यांच्या हातात द्यावा. मग आम्ही किती मदत आणून दाखवतो, ते बघा. एवढी हिंमत तुमच्यात आहे का? मनगटात हिम्मत असावी लागते. नुसता टोप घालून कुणी हिरो होत नाही, असंही नितेश राणे म्हणाले.

    मुंबई : चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झाले आहे. यावरुन आता राजकीय नेते पाहणी दौरा करत आहेत. दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरचा कोकण दौरा म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे. लिपस्टिक लावल्यावर सगळं कसं छान सुंदर आहे हे दाखवलं जातं आणि तोंड धुतल्यावर सगळं निघून जाते, तसा हा प्रकार असल्याचं नितेश राणे म्हणाले.

    दरम्यान उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा फोटोसेशनसाठी आहे. फोटोग्राफरने फोटो काढायचे असतात, स्वतःचे फोटो काढून घ्यायचे नसतात…जर ते फोटो काढून घेण्यासाठी येत असतील ते काम त्यांनी घरी बसूनच करावं…इथे यायची गरज काय ? इथे येतच असाल तर राज्याच्या जनतेच्या दिलसासाठी पॅकेज जाहीर करतात..निसर्ग चक्तीवादळाची, तौक्ते चक्रीवादळाची मदत द्या, असं नितेश राणेंनी म्हटलंय.

    उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन सर्व कारभार देवेंद्र फडणवीस यांच्या हातात द्यावा. मग आम्ही किती मदत आणून दाखवतो, ते बघा. एवढी हिंमत तुमच्यात आहे का? मनगटात हिम्मत असावी लागते. नुसता टोप घालून कुणी हिरो होत नाही, असंही नितेश राणे म्हणाले. आज मुख्यमंत्री पंचनामे करण्याचे आदेश देतात मग ते पंचनामे रद्दी भरण्यासाठी ठेवले आहेत का ? अधिकारी पर्यटनासाठी गावागावात फिरतात का? मुख्यमंत्री कोकणात येऊन काय दिवे लावणार आहेत, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.