ashish shelar-uddhav thakre

निवृत्त नौदल अधिकाऱ्याला कांदिवलीमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणात(attack on former naval officer) मुंबई पोलिसांनी ६ जणांना शुक्रवारी अटक केले आहे. या ६ जणांमध्ये शिवसेनेचा(shivsena) एक शाखाप्रमुख आणि एका कार्यकर्त्याचा समावेश असल्याचे समजते. यानंतर  भाजप नेते आशिष शेलार(ashish shelar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली आहे.

शेलार यांनी  आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेत, याकुबच्या फाशीला विरोध करणारे मुंबईचे पालकमंत्री..टायगर मेमनचे घर तोडले नाही, पण कंगणाचे घर तोडलेत..आता देशासाठी लढलेल्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला अमानुष मारहाण! निषेध!!

शेलारांनी ट्विटमध्ये पुढे शिवसेनेला प्रश्न विचारला आहे की, पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तान सोबत टक्केवारी?

निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणी  अटक झालेल्यांमध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम तसेच कार्यकर्ता संजय मांजरे यांचा समावेश आहे.