आयुक्त स्वतःला काय समजतात, महापौर किशोरी पेडणेकर आयुक्तांवर कडाडल्या

प्रभाग समित्यांची निवडणूक असल्यानं महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि शिवसेनेचे नगरसेवक सकाळी सभागृहात पोहोचले होते. परंतु पालिकेतील अधिकारी अनुपस्थित होते. त्यामुळे महापौरांसह शिवसेना नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले. आम्ही वेळात पोहोचलो परंतु अधिकारी गैरहजर होते. डीएमसी, वॉर्ड ऑफिसरना वारंवार फोन केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबई : मागील काही दिवस राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये मंदिर सुरु करण्यासाठी खडाजंगी सुरु आहे. त्यातच आज मुंबई महापालिका आयुक्त (commissioner) आणि महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar ) यांच्यातही वादावादी झाली आहे. मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी उद्धटपणे उत्तर देत असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला. यावर मुंबई महापौर किशोरी पेडणेक या आयुक्तांवर चांगल्याच कडाडल्या आहेत. त्या म्हणाल्या की, आयुक्तांनी महापौर, सभागृह नेत्या, नगरसेवकांचा मान राखावा अन्यथा राज्य शासनात परत जावं, तसेच मुख्यमंत्र्यांनाही याबाबत तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

काय आहे प्रकरण, जाणून घ्या

प्रभाग समित्यांची निवडणूक असल्यानं महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि शिवसेनेचे नगरसेवक सकाळी सभागृहात पोहोचले होते. परंतु पालिकेतील अधिकारी अनुपस्थित होते. त्यामुळे महापौरांसह शिवसेना नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले. आम्ही वेळात पोहोचलो परंतु अधिकारी गैरहजर होते. डीएमसी, वॉर्ड ऑफिसरना वारंवार फोन केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

आयुक्तांना काम जमत नसेल तर राज्यशासनात परत जावे

महापौर किशोरी पेडणेकर यांनी आयुक्तांना अनेकदा फोन केले असे त्या म्हणाल्या आहेत. बऱ्याचवेळा फोन केल्यानंतर एकादा प्रतिसाद मिळाला. त्यावेळी त्यांनी अतिशय उद्धट वक्तव्य करत बोलले. तुम्ही पॅनिक का होताय? तुम्हाला थोडा वेळ थांबता येत नाही का? अशा भाषेत ते फोनवर बोलले. आयुक्त कामात असतात परंतु त्यांनी ती कळवाया हवीत. किमान त्यांनी खुर्चीचा मान राखायला हवा. ते स्वतःला काय समजतात? त्यांना काम जमत नसेल तर राज्यशासनात परत जावं. असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

आयुक्तांच्या विरोधात सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनीदेखील प्रतिक्राय दिली आहे. त्या म्हणाल्या आयुक्त फोन घेत नाहीत. फोन उचल्यावर मी कोविड रुग्णालयांना भेटी देतोय. तुम्हाला संयम राखता येत नाही का, असे उद्धटपणे बोलतात. कोरोनाची परिस्थितीचा ताण आम्ही समजू शकतो. पण त्याचा राग फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीवर काढायचा नसतो.