Courtesy Social Media
Courtesy Social Media

या राड्यातून भाजपाला अनेक गोष्टी साध्य करायचा आहेत. एक मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करुन नकारात्मक दाखवणे, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना आणि कोरोनाचे संकट असताना शिवसैनिक कसे रस्त्यावर उतरुन आंदोलन करताहेत? यावर मुख्यमंत्री गप्प का? राज्यातील पोलीस खाते कसे बेकायदशीर कारवाई करते आणि सरकारच्या इशाऱ्यावर कसे चालते, इत्यादी अनेक गोष्टी भाजपाला या संघर्षातून साध्य करायचा आहेत.

  मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील चार नेत्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली. साधारण एक ते दिड महिन्याच्या कालावधीनंतर हे चार मंत्री महाराष्ट्रात परत आले, तेव्हा त्यांनी लोकांमध्ये पोहोचण्यासाठी आणि लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले. या 4 पैकी 3 मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा संपली, मात्र केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे.

  नारायण राणे यांची १९ ऑगस्टला मुंबईतून जन आशीर्वद यात्रेला सुरुवात केली. २६ ऑगस्टला या जन आशीर्वाद यात्रेचा समारोप होणार आहे. मात्र, सोमवारी रायगडमध्ये जन आशीर्वाद यात्रेत बोलताना नारायण राणे यांनी “मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव माहिती नाही, त्यावेळी मी त्यांच्याजवळ असतो तर, मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारली असती.” असे वादग्रस्त वक्तव्य केले. आणि येथूनच राणे-शिवसेना संघर्षाची ठिणगी पडली.

  मुळात कोकणात भाजपाची ताकद वाढविण्यासाठी आणि शिवसेनेला आव्हान निर्माण करण्यासाठी म्हणून भाजपाने नारायण राणे यांना पक्षात घेतलं. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी राणेंना केंद्रीय मंत्रीपद दिले असल्याची राजकीय वर्तुळत चर्चा आहे. तसेच, आगामी मुंबई महानगरपालिकेत भाजपाला जास्तीत जास्त यश मिळवायचे असेल तर राणेंना शिवसेनेसमोर उभे केले पाहिजे ही रणनिती भाजपाने आखली आहे.

  राणे आणि शिवसैनिकांचा मूळ डिएनए एकच आहे. कारण, राणेंची आक्रमकता, टीका करण्याची पद्धत, एकेरी भाषेच उल्लेख तसेच राणेंची टीका थेट शिवसेनेच्या नेतृत्त्वावर असल्याने ती शिवसैनिकांच्या अधिक जिव्हारी लागते. त्यामुळे शिवसैनिक पेटून उठतात. आता राणेंच्या वक्तव्याचा निषेध करताना राज्यातील विविध भागात भाजपच्या कार्यालयांवर दगडफेक करतायेत. यातून भाजपाचा संविधानीक पदावर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्याचा मुख्य प्रयत्न आहे. राणे-शिवसेना जर असाच संघर्ष चालू राहिला तर, माध्यमं सुद्धा फक्त या दोघांचीच दखल घेतील. आणि जर महाराष्ट्रात राणेंना अटक झाली तर, त्याचे देशभर पडसाद उमटतील आणि यामुळे भाजप आणि राणे हे लक्ष वेधून घेतील.

  जन आशीर्वाद यात्रेला मिळाणारा प्रतिसाद शिवसेनेच्या डोळ्यात खूपत आहे, असं भाजपाटं म्हणण आहे.

  या राड्यातून भाजपाला अनेक गोष्टी साध्य करायचा आहेत. एक मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करुन नकारात्मक दाखवणे, राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना आणि कोरोनाचे संकट असताना शिवसैनिक रस्त्यावर उतरुन कसे आंदोलन करताहेत? यावर मुख्यमंत्री गप्प का? राज्यातील पोलीस खाते कसे बेकायदशीर कारवाई करते आणि सरकारच्या इशाऱ्यावर कसे चालते, इत्यादी अनेक गोष्टी भाजपाला या संघर्षातून साध्य करायचा आहेत.

  नाराय़ण राणे यांचा शिवसेनेवर किंबहुना उद्धव ठाकरेंवर अधिक राग आहे, आणि शिवसैनिक नारायण राणे यांचा तिरस्कार करताहेत. भाजपाला या दोघांचा असाच संघर्ष पेटताना पाहयचे आहे, आणि यातून शिवसेनेला अधिकाधिक कसे नामोहरम करता येईल, शिवसेनेच खच्चीकरण कसे करता येईल हे पाहयचे आहे. भविष्यात राणेंची ढाल वापरुन भाजपला पक्षाची ताकद वाढवायची आहे. एवढे मात्र नक्की.