अनलाॅक संदर्भात कसा असेल ठाकरे सरकारचा प्लॅन ? : वाचा सविस्तर

आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. १ जून पासून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जातील. ज्या जिल्ह्यांमधील कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात असेल अशा जिल्ह्यांमधील निर्बंध हळूहळू शिथिल केले जातील. असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

    मुंबई : राज्यांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याने कोरोना रुग्ण संख्या आणि मृत्यू दर सुध्दा झपाट्याने वाढत असल्याने राज्यातील जनतेला पुन्हा एकदा लाॅकडाऊन लावण्यात आला. कोरोना संक्रमण पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये अधिक वेगाने होत आहे. परंतु लाॅकडाऊन नंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यात राज्यात दररोज ७० हजारांहून अधिक रूग्ण कोरोना संक्रमित होते. आता हाच आकडा ३० हजारांच्या खाली आला आहे. कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण सुध्दा काहीसा कमी झाला आहे.

    दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना लाॅकडाऊन बाबत काही महत्त्वाचे संकेत दिले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या मोठ्या शहरांमधील कोरोना रूग्णाच्या संख्येत गेल्या काही दिवसांत लक्षणीय घट झाली आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेग सुध्दा काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे राज्याला थोड दिलासा मिळाला आहे. पण मात्र ग्रामीण भागात कोरोनानं आपले हात पाय पसऱ्याला सुरूवात केली आहे. यावर बोलताना आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. १ जून पासून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जातील. ज्या जिल्ह्यांमधील कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात असेल अशा जिल्ह्यांमधील निर्बंध हळूहळू शिथिल केले जातील. असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

    राज्यात साध्या कोठेर निर्बंध लागू आहेत. सकाळी ७ ते ११ याचं वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. त्यामुळे कोरोना संक्रमण नियंत्रणात आला आहे. नाशिक, नागपूर मधील परिस्थिती देखील आटोक्यात आली आहे. त्यामुळे या भागातील निर्बंध १ जूनपासून हळूहळू शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. लाॅकडाऊन एकदम मागे घेण्याऐवजी टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल केले जातील. एका मराठी वृत्तवाहिनीच्या माहिती नुसार, राज्य सरकार ४ टप्प्यांत अनलाॅक सुरू करणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकाने उघडली जातील. लाॅकडाऊन मुळे दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांनचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात हे सर्व व्यवहार सुरू करण्याकडे राज्य सरकारचा भर असेल. तिसऱ्या टप्प्यात हाॅटेल, रेस्टॉरंट, बार सूरू करण्यात येतील. चौथ्या टप्प्यात राज्य सरकार लोकल आणि धार्मिक स्थळे सुरू करणार असल्याचे समजते. जिल्हा बंदी कधी उठवायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.