ashish shelar-uddhav thakre

कोरोनामुळे देवीच्या मुर्तीची उंची किती असणार? सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे स्वरूप कसे असणार? गणेशोत्सवाचे नियम याही उत्सवाला लागू राहणार? कि त्यात बदल करणार? याबाबतची स्पष्टता वेळीच मुर्तीकरांना देणे आवश्यकक आहे. असं आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.

गणेश मुर्तींची लगबग संपली की मुर्तीकार देवीच्या मुर्ती तयार करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे यावेळी कोरोनामुळे देवीच्या मुर्तीची उंची किती असणार? सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे स्वरूप कसे असणार? याबाबतची स्पष्टता वेळीच मुर्तीकरांना द्या, अशी विनंती भाजपचे आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.

आशिष शेलारांचे सीएम उद्धव ठाकरेंना पत्र ? 

गणेशोत्सवानंतर महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवाची तयारी लगेचच सुरू होते. विशेषत: देवीच्या मुर्ती बनवण्याची सुरूवात तातडीने केली जाते. गणेश मुर्तींची लगबग संपली की मुर्तीकार देवीच्या मुर्ती तयार करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे यावेळी कोरोनामुळे देवीच्या मुर्तीची उंची किती असणार? सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे स्वरूप कसे असणार? गणेशोत्सवाचे नियम याही उत्सवाला लागू राहणार? कि त्यात बदल करणार? याबाबतची स्पष्टता वेळीच मुर्तीकरांना देणे आवश्यक आहे. असं आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.

कोरोनामुळे गणेशमूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकार व कारखान्यांना मोठा फटका बसला आहे. मुर्तीच्या उंचीबाबत स्पष्टता देण्यास विलंब झाल्याने काऱखान्यात ४ फुटांपेक्षा उंच असलेल्या मोठ्या मुर्ती शिल्लक राहिल्या आहेत. तसेच कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने मुर्तीकारांना त्याचा फटका बसला. पेणमधील दोहे, हमरापुर, केळवे यांसारख्या मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तीचे मूर्तिकार आणि कारखाने असलेल्या गावांना गतवर्षीच्या तुलनेत २० ते २५ कोटी रूपयांचा फटका बसला आहे. बहुसंख्य तेच मूर्तीकार त्यात कारखान्यात पुन्हा देवीच्या मुर्ती घडवित असल्याने त्यांना वेळीच सरकारने स्पष्टता देण्याची गरज आहे. असे आशिष शेलार यांनी या पत्राद्वारे सांगितले आहे.