… मुख्यमंत्री केला तर त्यात चुक काय?”, कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याचं मोठं विधान

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला असताना दुसरीकडे शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत युती करावी लागेल असं सूचक विधान केलं आहे. या सर्व घडामोडींदरम्यान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील आगामी निवडणूक पक्षाने स्वतंत्र लढवली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.

    मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारला दीड वर्ष पूर्ण झाली असतानाच स्वबळाचा नारा दिला जात असल्याने सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला असताना दुसरीकडे शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत युती करावी लागेल असं सूचक विधान केलं आहे. या सर्व घडामोडींदरम्यान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील आगामी निवडणूक पक्षाने स्वतंत्र लढवली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.

    चव्हाण काय म्हणाले ?

    दरम्यान महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात आलं आहे का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी नकार दिला. “अजिबात नाही. भाजपाला बाहेर ठेवण्याच्या दृष्टीकोनातूनच हे सरकार स्थापन करण्यात आलं होतं. त्यांना राज्यात सर्व गोंधळ घातला होता. आमचं उद्दिष्ट अद्यापही तेच आहे. काँग्रेस काही जिल्ह्यांमध्ये इतकी मजबूत नसून आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.

    पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असावा असं तुम्ही म्हटलं आहे असं विचारण्यात आलं असता चव्हाण यांनी असं सांगितलं की, “काँग्रेस महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर आहे. जर काँग्रसेची पहिल्या क्रमांकावर येण्याची इच्छा असेल तर त्यात चुकीचं काय?. जर आमच्या आमदारांची संख्या जास्त असेल तर आमचा मुख्यमंत्री होईल. आतापर्यंत अशीच पद्धत राहिली आहे”. शिवसेनेसोबत असणाऱ्या वैचारिक मतभेदासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “तुम्ही त्याकडे हवं तसं पाहू शकता. पण हे सरकार एका विशिष्ट ध्येयाने तयार करण्यात आलं आहे. आम्ही शिवसेनेची विचारसरणी सहन करु शकतो, पण भाजपाला अजिबात नाही”. असंही चव्हाण म्हणाले.

    काँग्रेसचा मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही…

    ‘नाना पटोले हे (२०२४)साली महाराष्ट्राच्या गादीवर काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवल्या शिवाय राहणार नाहीत हे आता नक्की झाला आहे’ याबरोबरच महाविकास आघाडीतील काँग्रेस हा महत्त्वाचा घटक आहे, पण महाराष्ट्रात त्यांच्या पक्षा तिसऱ्या स्थानावर असल्याने स्वबळाची गर्जना करून नाना पटोले यांनी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण केलाय. असेदेखील शिवसेनेकडून सांगण्यात आले.